spot_img

कर्मचारी व गटविकास अधिकारी यांच्यातील वाद पेटला कार्यालयातील खुर्च्या झाल्या रिकाम्या, कर्मचाऱ्यांनी सुरू केले काम बंद आंदोलन

आर्वी,दि.१४:- कर्मचारी व गटविकास अधिकारी सुनीता मरस्कोल्हे यांच्यातील वाद इरेला पेटला असुन गुरुवारी (ता.१४) कर्मचाऱ्यांनी अचानक काम बंद आंदोलन सुरू केले आहे. परिणामी कार्यालयातील सर्व खुर्च्या रिकाम्या होवून काम ठप्प झाले आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना मनस्तपाप सहन करावा लागत असुन आल्यापावली परत जावे लागत आहे.
येथील गटविकास अधिकारी सुनीता मरस्कोल्हे यांच्या वागणुकीवर व विक्षीप्त कार्यशैलीवर आक्षेप घेत. पंचायत समितीमधील ५० पैकी ४५ कर्मचाऱ्यांनी वर्धा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहण घुगे यांच्याकडे तक्रार दाखल करुन बदलीची मागणी केली होती. तक्रारीची दखल घेत त्यांनी चौकशी करीता तिन सदस्यांची समिती सुध्दा नेमली. यामुळे संतुष्ट झालेल्या कर्मचाऱ्यांनी पुन्हा काम सुरू केले. मात्र गटविकास अधिकारी सुनीता मरस्कोल्हे यांच्या वागणुकीत काहीच फरक पडला नाही. एका एका कर्मचाऱ्याला बोलावणे त्यांना धमकावणे, त्यांचा पाणउतारा करणे, विनाकारण त्रस्त करणे, शोकाज नोटीस देण्याची धमकी देणे आदि प्रकार पुर्वी पेक्षा जोरात सुरू झाले. कर्मचारी व अधिकारी त्रस्त झाले. कोणावरही कधी काय आळ घेईल याचा भरवसा नसल्याने त्यांनी गरुवार (ता.१४) पासुन कामबंद आंदोलन सुरू केले आहे. याचा नाहक मनस्ताप ग्रामीण भागातील नागरिकांना सहन करावा लागत आहे.
हनुमंताच्या साक्षीने घेतला निर्णय
पंचायत समिती कार्यालयात कर्त्यव्यावर पोहचल्यानंतर सर्व अधिकारी व कर्मचारी परिसरातील हनुमान मंदिरापुढे एकत्र आले. तक्रार केल्या नंतर गटविकास अधिकारी यांच्याकडून मिळालेल्या वागणुकीचा पाढाच एकऐकाने वाचला आणी काम करावे कसे असा प्रश्न उपस्थीत केला. परिणामी दोन दिवसाकरीता कामबंद आंदोलन करण्याचा निर्णय हनुमंताच्या साक्षीने घेतला.
नागरिक आल्यापावली गेले परत
घरकुल योजनेचे लाभार्थी, सिचंन विहीरीचे लाभार्थ्यी या सारख्याच विविध कामाकरीता ग्रामीण भागातून पंचायत समिती कार्यालयात आलेल्या नागरिकांना खाली खुर्च्या पाहुन परत जावे लागले असुन त्यांच्यावर आर्थीक भुर्दंड तर पडलाच शिवाय मनस्ताप सुध्दा सहन करावा लागला.
सरपंच वर्षा चौकोणे
बोथली (किन्हाळा) ग्रामपंचायत क्षेत्रातील लोकांची अडलेली कामे घेवून पंचायत समिती कार्यालया मध्ये आले होते. मात्र कर्मचारी व अधिकारी अचानक संपावर गेल्यामुळे एकही काम होवू शकले नाही. शुक्रावार (ता.१५) पर्यंत काम बंद आदोलन त्यानंतर दोन दिवसाच्या सुट्या अशातच आचार संहिता लागण्याची शक्यता. या सर्वाचा विचार केला तर आज होणारी कामे हि तिन ते चार महिण्यापर्यंत लाबण्याची शक्यता निर्माण झाली आहे आणी याचा मनस्ताप विनाकारण नागरिकांना सहन करावा लागणार आहे असे बोथली (किन्हाळा) ग्रामपंचायतीच्या सरपंच वर्षा चौकणे यांनी सांगीतले.
कर्मचाऱ्यांनी आरोप फेटाळला
गटविकास अधिकारी सुनिता मरस्कोल्हे यांनी आदिवासी महिला असल्यामुळे माझ्यावर खोटा आरोप केल्या जात आहे असे सांगीतले होते. यावर कर्मचाऱ्यांनी स्पष्टीकरण देतांना, पंचायत समितीमध्ये कार्यरत असलेल्या सर्वच अधिकारी व कर्मचाऱ्यांचा आंदोलनात समावेश आहे. यात महिला व आदिवासी समाजाचे कर्मचारी सुध्दा सहभागी असुन आम्ही व्देषभावने पोटी तक्रार केली नाही सांगीतले.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या