सुमित वानखेडे यांच्या प्रयत्नांना मिळाले यश ९ गावाचा प्रलंबित पुर प्रश्न कायमचा लागणार मार्गी वर्धा जिल्ह्याच्या वतीने सादर करण्यात आलेल्या आपत्ती सौम्यीकरणाच्या 60 प्रस्तावांना प्रकल्प मुल्यमापन समितीने शिफारस केली होती. त्याला राज्य कार्यकारी समितीने डिपीआर तयार करण्यासाठी मंजुरी दिली आहे. यात आर्वी विधानसभा मतदार संघातील 9 कामांचा समावेश आहे. आर्वी मतदार संघातील तळेगाव (श्या. पंत) येथे पूर संरक्षक भींतीसाठी अंदाजित रक्कम 2 कोटी 25 लाख, सासवली खुर्द येथे पूरसंरक्षक भींतीसाठी 1 कोटी 75 लाख, कन्नमवारग्राम येथे पूरसंरक्षक भींतीसाठी 2 कोटी 20 लाख, थार येथे पूरसंरक्षक भिंतीसाठी 1 कोटी 90 लाख, देलवाडी येथे 1 कोटी 75 लाख, अहिरवाडा येथे पूरसंरक्षक भिंत आणि बगिचा बांधकामासाठी 1 कोटी 70 लाख, खुबगाव येथे पूरसंरक्षक भिंतीकरीता 2 कोटी 75 लाख, वाई येथे संरक्षकभिंत आणि सीडी वर्ककरिता 2 कोटी 10 लाख तर येनगाव येथे 1 कोटी 90 लाख रुपये मंजूर करण्यात आल्याची माहिती सुमीत वानखडे यांनी दिली. या कामामुळे 2011 च्या लोकसंख्ये नुसार तळेगाव येथे 1 हजार 867 लोकांना फायदा होणार आहे. सावली खुर्द येथे 1 हजार 512, कन्नमवारग्राम येथे 1 हजार 520, थार येथे 1 हजार 302, देलवाडी येथे 709, अहिरवाडा येथे 622, खुबगाव येथे 1 हजार 509, वाई येथे 623 तर येनगाव येथे 966 लोकांना या कामाचा प्रत्यक्ष फायदा होणार आहे. आर्वी विधानसभा मतदार संघातील या गावात अप्पर वर्धा प्रकल्प, लोअर वर्धा प्रकल्प व स्थानिक नदीपात्रात आलेल्या अतिरिक्त पाण्याने उद्भवत असलेल्या पुर परीस्थितीचा प्रश्न कायमचा मार्गी लागणार आहे. याच प्रमाणे मतदारसंघात अनेक समस्या कायम असल्याने अनेक लोक आपल्याकडे आशाभूत नजरेने काम घेऊन येतात. व्यक्तिगत काम करणे बरेचदा अडचणीचे ठरते. परंतु, सार्वजनिक कामाकरिता प्रशासनात पाठपुरावा केल्यास त्यात यश मिळते. आपला मतदारसंघ हा सर्व सोयीसुविधा युक्त असावा, यासाठी आपले प्रयत्न आहेत. प्रामाणिक प्रयत्नातून जनतेचे कामे करण्याचा एक वेगळाच आनंद असतो, अशी प्रतिक्रिया युवानेते सुमीत वानखेडे यांनी दिली.