spot_img

विविध भजन स्पर्धा घेऊन राष्ट्रसंत यांना वाहिली श्रद्धांजली

आष्टी ( श) : येथील हुतात्मा राष्ट्रीय विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे वं. राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथी दि. २१ आक्टोबर रोजी विविध कार्यक्रमात वं. राष्ट्रसंतांच्या तैलचिञाचे विधीवत पूजन करून दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरूवात झाली.या वेळी सबसे उचा है धन. मेरा प्यारा भजन,इसपे सारा तन मन कुर्बान रहेगा..सादर करून औचित्य पर महत्त्वविषद करताना अतिथी म्हणाले की वं.राष्ट्रसंताचे भजन हे सामाजिक परिवर्तनाचे एक धन होते. त्यांनी शेवटपर्यंत भजन, कीर्तन व प्रवचन घेत अनेक वाईट रूढी, प्रथा व परंपरा तसेच अंधश्रद्धा यामध्ये गुर्फतलेल्या समाजाला खरा जीवन मार्ग दाखविला तसेच भजन. साहित्य प्रबोधनाने ब्रिटिशांविरुद्ध आष्टी व चिमूर याठिकाणी स्वातंत्र्य क्रांती घडवून आणली. याचे मुलांना भान असावे म्हणून राष्ट्रसंताच्या पुण्यतिथी निमित्य हुतात्मा राष्ट्रीय विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे वर्ग 5 वी ते 12 वी च्या मुलां मुलींसाठी राष्ट्रसंताने लिहलेल्या भजणांची स्पर्धा घेण्यात आली.त्यामध्ये 25 विद्यार्थ्यांनी उत्फुर्त सहभाग घेतला. त्यामध्ये वर्ग सहावीचा चिमुकला वंश भगत यांनी प्रथम क्रमांक पटकविला. ऋतुजा मडावी दुसरा तर स्वेता गायकी हिने तिसरा क्रमांक मिळाला.या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष पुंडलिक नागतोडे सर. मुख्याध्यापक, अतिथी वीणा तांबसकर उपमुख्याध्यापक, प्रा. पुंडलिक पेठे. पाटील सर, यांचे हस्ते मुलांना बक्षीस देऊन गौरव करण्यात आला. भजन स्पर्धा मूल्य मापन चोरे मॅडम, कदम मॅडम, कडू सर, इखार सर यांनी केले.
शेवटी सर्वधर्म प्रार्थना घेऊन राष्ट्रसंताला मौन श्रद्धांजली सर्व विध्यार्थी व शिक्षकांनी अर्पण केली. कार्यक्रम संचालन पवार सर तर आभार शिंदे मॅडम यांनी मानले. राष्ट्रवंदना घेऊन सांगता करण्यात आली.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या