वर्धा दि.23 (जिमाका)- विधानसभा निवडणूकीकरीता निवडणूक आयोगाने नियुक्त केलेले निवडणूक खर्च निरिक्षक ज्ञानेंद्र कुमार त्रिपाठी यांनी आर्वी विधानसभा मतदार संघातील आष्टी तालुक्यातील खडका येथील स्थीर निगराणी पथकास भेट देऊन पथकास मार्गदर्शन केले. तसेच निवडणूक प्रक्रियेबाबत उपविभागीय कार्यालय आर्वी येथे आढावा घेतला. यावेळी सहायक खर्च निरीक्षक रवींद्र जोगी निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी विश्वास शिरसाठ, तहसीलदार हरीश काळे, तहसीलदार हंसा मोहने, उपविभागीय पोलीस अधिकारी खंडेराव, तसेच विविध पथकातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते
यावेळी निवडणूक खर्च निरिक्षक ज्ञानेंद्र कुमार त्रिपाठी यांनी कार्यालयात कार्यरत खर्च बाबत स्थापन करण्यात आलेल्या खर्च नोंदणी पथक तसेच आचारसंहिता कक्षास भेट देवून नोडल अधिकारी यांना मार्गदर्शन केले. भेटी दरम्यान 44-आर्वी मतदार संघ अंर्तगत निवडणूक खर्च बाबत FST पथकांना मार्गदर्शन करुन उपस्थित सर्व अधिकारी / कर्मचारी यांना मार्गदर्शन केले तसेच आचारसंहितेच्या बाबत निवडणूक आयोगामार्फत प्राप्त मार्गदर्शक सुचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी, अशा सूचना ज्ञानेंद्र कुमार त्रिपाठी यांनी यावेळी दिल्या.

