spot_img

*कामगार पोरगा आमदार व्हावा ही सामान्य जनतेची इच्छा..* *पंकज ठाकरे हा कामगार पोरगा आमदार होणार..*

*हिंगणा प्रतिनिधी*:-
विधानसभेच्या निवडणूकांचे बिगुल वाजले आहे, तारखा जाहीर झाल्या आहेत. नागपूर जिल्ह्यातील हिंगणा विधानसभा मतदार संघातून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून तिकीट मिळावी म्हणून पंकज ठाकरे संस्थापक अध्यक्ष कर्मयोगी फाऊंडेशन नागपूर, यांनी आपली दावेदारी मोठ्या प्रमाणात मजबूत केली आहे.
कर्मयोगी फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष पंकज ठाकरे या कामगार पोराने हिंगणा विधानसभा निवडणुक लढवावी यासाठी सामान्य जनता सोशल मीडियावर उतरली तर आहेच व सोबतच गावागावात जाऊन मोठ्या प्रमाणात जनसंपर्क साधण्याच कार्य करत आहे. त्याच सर्वात महत्वाच कारण म्हणजे आपल्या बोलते नव्हे तर कर्ते व्हा या तत्वानुसार पंकज ठाकरे यांनी तब्बल २१७ गावात ४५ उपक्रम राबवित जे बोलले ते कृतीत उतरवले, त्यानी मानवता जपत कोरोना काळात अविरत सेवा देत ७१ दिवस अन्नदान करत मृतांची राख उचलण्यापासून कार्य केले. ३०२ विधवा ताईंच्या मुलींना सायकल वाटप, १७९ विधवा ताईंना शिलाई मशीन वाटप, तब्बल २०६ गावात आधार काठी( कुबळी) वाटप, हजारो लोकांचे नेत्र तपासून त्यांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया निशुल्क करून देत मोठ्या प्रमाणात चष्म्यांचे निशुल्क वाटप, अल्पभूधारक शेतकरी, विधवा ताईंच्या मुलींना शिक्षणासाठी व लग्नासाठी आर्थिक मदत, नवरात्रात विधवा ताईंचा साडीचोळी देऊन सन्मान, त्यांच्यासाठी भव्य हळदीकुंकू कार्यक्रम आयोजित करून परिवर्तनाची नांदी दिली फुटपाथवर काम करणाऱ्या लोकांना छत्री वाटप, कामगारांच्या मुलींसाठी निशुल्क सुसज्ज अभ्यासिका, गुणवंत मुलाचे सत्कार सोहळे, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव ७५ सैनिक परिवाराने सन्मानित करून साजरा केला. बुटीबोरी येथे कामगार कल्याण मंडळ स्थापन करण्यास पुढाकार, १ मे कामगार दिनाचे भव्य आयोजन, गावागावात मोठ्या प्रमाणात श्रमदान, ग्रामस्वच्छता सप्ताह आयोजन, नदीघाट, मोक्षधाम स्वच्छता, वृक्षारोपण, प्रेमाची वागणूक देत लोकांच्या मदतीला मोठ्य प्रमाणात धावून जाणे, कर्मयोगीने आता तर अशी व्यवस्था उभारायचा संकल्प केला आहे की ग्रामीण भागात कोणत्याही शेतकऱ्याने आत्महत्या केली नाही पाहिजे, कोणत्याही गरीब मुलीचे शिक्षण व लग्न थांबले नाही पाहिजे. कोणताही माणूस पैशाच्या अभावामुळे मरण पावला नाही पाहिजे. अशी व्यवस्था उभारत गाव स्वच्छ सुंदर व समृद्ध करण्याचा संकल्प घेतला आहे. हिंगणा मतदार संघाचे विद्यमान आमदार यांचं कार्य व त्यांची आर्थिक क्षमता पाहून कितीही मोठा पैसेवाला माणूस विद्यमान आमदार यांना पराभूत करू शकत नाही तर पोटाची खळगी भरण्यासाठी आलेला कामगार ज्याने शून्यातून विश्व निर्माण करत आपल्या कृतिशील कार्यातून लोकांच्या मनावर राज्य करत गावागावात आपले संघटन उभे केले आहे, प्रभावी वक्तृत्व असणारे व गोरगरिबांचं चांगलं व्हावं ही प्रचंड तळमळ असणारे, विदर्भाचं कल्याण व्हावं हे ध्येय घेऊन चालणारे कर्मयोगीचे संस्थापक अध्यक्ष पंकज ठाकरेचं विद्यमान आमदार यांना टक्कर देऊ शकतात ही चर्चा हिंगणा मतदार संघात मोठ्या प्रमाणात होत आहे, धनशक्ती विरुद्ध श्रमशक्ती ही लढाई हिंगणा विधानसभा मतदार संघात पहायला मिळेल अशी चर्चा मोठ्या प्रमाणात ऐकायला मिळत आहे.
*पंकज ठाकरे यांची बलस्थाने:-*
१) हिंगणा विधानसभा क्षेत्रातील १९४ गावात कर्मयोगी फाऊंडेशनचे तळागाळापर्यंत ४५ उपक्रम राबवित मोठ्या प्रमाणात कार्य.
२)हिंगणा विधानसभा मतदार संघ हा कामगारांचा मतदार संघ म्हणून ओळखला जातो. पंकज ठाकरे हे स्वतः कामगार आहेत. महाराष्ट्र सरकारच्या गुणवंत कामगार पुरस्काराने ते सन्मानित आहेत.
३) कुणबी मतदारांची संख्या सर्वात जास्त असलेला मतदार संघ, पंकज ठाकरे हे कुणबी व ओबीसी समाजाचा एक मोठा घटक असल्यामुळे जमेची बाजू.*
४)१०९ गावात प्रत्येकांच्या घरोघरी जाऊन सुखदुःख जाणत प्रेमरूपी अभियान राबवित अनेकांना शक्य ती मदत केली त्यामुळे लोकांच्या मनावर राज्य करत मोठ्या प्रमाणात व्यक्तिगत मतदान मिळविण्याची क्षमता..
५) स्वतःची २४ लोकांची प्रामाणिक निस्वार्थ टीम व कर्मयोगी सोबत जुळलेले हजारो कार्यकर्ते ही प्रचार यंत्रणेसाठी सर्वात मोठी जमेची बाजू..
६) प्रामाणिक व्यक्तिमत्त्व व गोरगरिबांचे कैवारी म्हणून मोठी ओळख*
७) संघटनशक्ती कौशल्य, प्रभावी नियोजन, दूरदृष्टी व प्रेरणादायी प्रभावी वक्तृत्व, उच्चशिक्षित गरिबीची जाण असणार जमिनीशी धरून असणार व्यक्तिमत्त्व..

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या