वर्धा, दि. 24 : निवडणूक आयोगाव्दारे विधानसभा मतदार संघासाठी खर्च निरीक्षक म्हणून ग्यानेंद्र कुमार त्रिपाठी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत प्रत्येक उमेदवाराला आणि राजकीय पक्षाला खर्चाची मर्यादा दिली आहे. त्यानुसार उमेदवार व पक्षाकडून होणाऱ्या दैनदिन खर्च विषयक बाबींचे निरीक्षण करण्यासाठी खर्च निरीक्षक म्हणून ग्यानेंद्र कुमार त्रिपाठी यांची भारत निवडणूक आयोगाने नियुक्ती केली आहे.
ग्यानेंद्र कुमार त्रिपाठी यांची निवास व्यवस्था शासकीय विश्रामगृह वर्धा येथील शिशिर या व्ही.आय.पी. कक्षात करण्यात आली आहे. त्यांचे संपर्क अधिकारी म्हणून संजय बमनोटे हे आहेत. नागरिकांना निवडणूक खर्च विषयक काही तक्रार असल्यास निवडणूक खर्च निरिक्षक ग्यानेंद्र कुमार त्रिपाठी यांच्या 7620745795 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा, असे निवडणूक शाखेकडून कळ
उमेदवारांनी सादर केलेल्या खर्चाची बारकाईने तपासणी करा
– *निवडणूक खर्च निरिक्षक ज्ञानेंद्र कुमार त्रिपाठी*
जिल्ह्यातील चारही विधानसभा निवडणूक खर्च पथकाचा आढावा
वर्धा, दि. 24 : विधानसभा निवडणूकी करीता उमेदवारांना आयोगाने खर्च करण्याची मर्यादा ठरवून दिलेली आहे. त्यानुसार उमेदवार व राजकीय पक्षांना विविध प्रचाराकरीता, निवडणूक साहित्य तयार करण्याकरीता व वापर करण्यासाठी येणा-या खर्चाचे दर ठरवून दिलेले आहे. ठरवून दिलेल्या दराप्रमाणेच उमेदवारांनी सादर केलेल्या देयकाची बारकाईने तपासणी करावी, अशा सुचना निवडणूक खर्च निरिक्षक ज्ञानेंद्र कुमार यांनी आज चारही विधानसभा निवडणूक खर्च पथकाच्या आढावा बैठकीत केल्या.
बैठकीला जिल्हानिवडणूक अधिकारी राहुल कर्डिले, उप जिल्हा निवडणूक अधिकारी अनील गावीत, जिल्हास्तरीय खर्चविषयक नोडल अधिकारी सुरज बारापात्रे याची उपस्थिती होती.
फ्लाइंग स्क्वॉड (एफएसटी), स्टॅटिक सर्व्हिलन्स टीम (एसएसटी), व्हिडिओ सर्व्हिलन्स टीम (व्हीएसटी), व्हिडिओ व्ह्यूइंग टीम (व्हीव्हीटी), अकाउंटिंग टीम (एटी), चे पथकांनी उमेदवारांच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष केंद्रीत करुन उमेदवारांकडून करण्यात येणा-या खर्चावर लक्ष दयावे. त्याचबरोबर प्रचार सभांसाठी वाहतुकीस वापरण्यात येणारी वाहने, उपस्थितांवर होणारा खर्च, मंडप, बिछायत, भोजन खर्च, प्रचार साहित्य इत्यादीवर होणा-या खर्चावर बारकाईने लक्ष दयावे. अशा सुचना निवडणूक खर्च निरिक्षक ज्ञानेंद्र कुमार त्रिपाठी यांनी केल्या.

