देवळी प्रतिनिधी
देवळी विधानसभा निवडणुकी मध्ये नामांकन दाखल करण्याकरिता भारतीय राष्ट्रीय काँग्रेस,राष्ट्रीय समाज पक्ष,नामांकन दाखल करण्याकरिता प्रत्येकाने शक्ती प्रदर्शन व रॅल्याचे आयोजन करून नामांकन अर्ज दाखल केला यामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार रणजित कांबळे, राष्ट्रीय समाज पक्षाच्या अश्विनी शिरपूरकर,यांनी नामांकन पत्र दाखल केले भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार रंजीत कांबळे यांची महा रॅली भोंग सभागृह येथून आयोजित करण्यात आली.प्रथम भोंग सभागृहामध्ये खा. अमर काळे यांच्या अध्यक्षाखाली मार्गदर्शन सभा झाली यामध्ये रंजीत कांबळे,सुधीर कोठारी,अभ्युदय मेघे, संजय कामनापुरे,मनोज वसु,बाळा शाहकाळकर,अजिंक्य तांबेकर, सुनील बासु मोरेश्वर खोडके, हरीश ओझा,अजय देशमुख,शाम महाजन,यांनी सुद्धा मार्गदर्शन केले भोंग सभागृहापासून निघालेली महा रॅली इंदिरा पुतळा तर गांधी चौक, ठाकरे चौक,आठवडी बाजार मार्ग तहसील कार्यालयात नेण्यात येऊन समारोप करण्यात आला.यावेळी खा, अमर काळे व सुधीर कोठारी,यांचे उपस्थितीमध्ये नामांकन अर्ज दाखल करण्यात आला.काँग्रेसच्या या महा रॅलीने देवळीला दुमदुमून सोडले. त्याचप्रमाणे रुक्मिणी सभागृहामध्ये राष्ट्रीय समाज पक्षाचे कार्यकर्ते गोळा होऊन तेथे कार्यकर्त्यांना उमेदवार अश्विनी शिरपूरकर यांनी मार्गदर्शन करून रुक्मिणी सभागृहापासून रॅलीचे आयोजन करण्यात आले होते ही रॅली रुक्मिणी सभागृहापासून आंबेडकर पुतळा ते तहसील कार्यालयाजवळ नेण्यात आले व तेथे समारोप झाला रुक्मिणी सभागृहामध्ये उमेदवार अश्विनी शिरपूरकर तसेच पक्षाचे समन्वयक राजू गोरडे, अरुण लाबांडे,रामेश्वर लांडे,डॉ कपिल मून,सुनील हिंगे, राजू भगत, सतीश भोपटे, अनिल वैद्य,दिनेश तालन, विजय होटे, यांची उपस्थिती होती. या रॅल्यामुळे देवळी शहरांमध्ये निवडणुकीचे वातावरण दिसून आली

