spot_img

*साहूर सर्कलमध्ये सौ. मयूर काळे यांचा मतदाराशी संवाद*  *विविध गावांना भेटी: मतदार संघाच्या विकासासाठी सदेव कटीबद्ध राहू असे दिली ग्वाही.

 

आर्वी विशेष प्रतिनिधी *: महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ. मयुरा काळे यांनी आष्टी तालुक्यातील साहूर सर्कल मध्ये बुधवार रोजी मतदारांशी थेट संवाद साधला. या दौऱ्याप्रसंगी नागरिकांकडून उस्फुर्त असा प्रतिसाद मिळाला.

आष्टी तालुक्यातील साहूर सर्कलमध्ये बुधवार रोजी वडाळा , सत्तारपुर , बोरगाव (टुमनी), माणिकवाडा, तारा सांवगा, धाडी, दुर्गवाडा, या गावांमध्ये प्रचार दौरा केला. गावागावात जाऊन त्यांनी मतदारासोबत थेट संवाद साधला. गावातील विकासासाठी सदैव कटिबद्ध राहू अशी ग्वाही याप्रसंगी दिली.

महिला सक्षमीकरण धोरणाच्या दृष्टीने ३३ टक्के महिला आरक्षण हा शुद्ध हेतू लक्षात घेता राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी प्रथमच विधानसभेमध्ये महिला उमेदवारी दिल्यामुळे परिणामी महिला वर्गामध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले दिसून येत आहे. याउलट भारतीय जनता पक्षाकडून महिला सक्षमीकरण धोरणाची वंलगणा करणारे या उमेदवारीमुळे जवळ चपराक बसल्याचे जनतेमधून सुर निघत आहे.

या दौऱ्याप्रसंगी आष्टी पंचायत समितीचे माजी सभापती अरुण बाजारे, ईश्वर वरकड, दिलीप निंभोरकर, ज्ञानेश्वर जमालपुरे, जितेंद्र शेटे, रवींद्र गंजीवाले, नगराध्यक्ष अनिल धोत्रे, माजी महिला बालकल्याण सभापती बेबीताई बिजवे, सुरज ढोले, धाडीचे सरपंच दिलीप भाकरे, रामकृष्ण वडस्कर आदींची उपस्थिती होती.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या