हिंगणघाट :- जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांच्या मूळ गाथेचे लेखनकर्ते, संत शिरोमणी श्री संत संताजी जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथी कार्यक्रम श्री.साई हॉल, नंदोरी रोड येथे पार पडला.
याप्रसंगी संत संताजी जगनाडे महाराजांच्या फोटोला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.
श्री.संत संताजी जगनाडे महाराज यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकत त्यांचे कार्य अतुल वांदिले यांनी मनोगतात व्यक्त केले.
याप्रसंगी अतुल वांदिले, योगेश्वर महाराज, चंद्रकांत वाढई, किरण वैद्य, साखरकर गुरूजी, संदीप रेवतकर, मधुकरराव चाफले गुरुजी, दशरथ ठाकरे, बालु वानखेडे,अमोल बोरकर, वामनराव गिरी, मधुकरराव खडसे, किशोर शेगोकार, भाऊराव कोटकर, शंकर देशमुख, किशोर गाठे, सुनील भुते, किशोर चांभारे, सुधाकर वाढई, जगदिश वांदिले, बंटी रघाटाटे, बचू कलोडे, गजानन महाकाळकर, जगदिश पिसे, अनिल अडकिने, अमोल मुडे,राजू मुडे आदी उपस्थित होते.

