22 जानेवारी व 1 फेब्रुवारी रोजी प्रशिक्षण
वर्धा, दि.31 (जिमाका) : लोकसेवा आयोगाद्वारे दि.5 जानेवारी 2025 रोजी महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 चे आयोजन करण्यात आले होते. परंतु प्रशासकीय कारणास्तव सदर परीक्षा दि.2 फेब्रुवारी 2025 रोजी एक सत्रात घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे. त्यामुळे परीक्षेसाठी नियुक्त करण्यात आलेल्या सर्व अधिकारी व कर्मचा-यांची परीक्षेसाठी पदानुसार नेमुण दिलेल्या ठिकाणी नियुक्ती कायम ठेवून पुर्वी नियोजित करण्यात आलेले प्रशिक्षण रद्द करुन सुधारीत पहिले दि.22 जानेवारी 2025 रोजी व दुसरे प्रशिक्षण दि.1 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आले आहे. याची नोंद परीक्षेसाठी नियुक्त करण्यात आलेल्या अधिकारी व कर्मचा-यांनी घ्यावी, असे निवासी उपजिल्हाधिकारी शिवराज पडोळे यांनी कळविले आहे.

