spot_img

*राष्ट्रीय नकलाकार हरिभाऊ बेलूरकर अभिष्टचिंतन सोहळा १जानेवारीला आयोजन!!*

वर्धा: दिनांक ३१डिसेंबर२०२५ महाराष्ट्राच्या सामाजिक, क्रीडा व सांस्कृतिक चळवळीला उज्वल इतिहास आहे.सांस्कृतिक क्षेत्रात नाट्य, संगीत, भजन, कीर्तन, प्रवचन, लोक प्रबोधन या विविध लोककलेच्या माध्यमातून नकला नवलकलेचा विशेष सन्मान मिळून देणारे राष्ट्रीय नकलाकार श्री हरिभाऊजी मोतीरामजी बेलूरकर श्रीक्षेत्र वरखेड तालुका तिवसा जिल्हा अमरावती यांच्या ८९वा जन्मदिन अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन बुधवार दिनांक १जानेवारी २०२५रोजी परमहंस श्रीसमर्थ सद्गुरू आडकुजी महाराज यांच्या समाधी मंदिराचे पुजन व हारार्पन करून राज्यसभेचे खासदार व माजी मंत्री डॉ अनिलभाऊ बोंडे यांचे अध्यक्षतेखाली डॉ भाऊसाहेब व पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ शरदराव निंबाळकर यांच्या शुभहस्ते प्रमुख अतिथी व मार्गदर्शक विजयराज बोधनकर चित्रकार लेखक व्याख्याते, मुंबई प्रमुख नवनिर्वाचित आमदार श्री राजेशभाऊ वानखेडे, तिवसा, उमेशभाऊ उपाख्य चंदुभाऊ यावलकर, वरूड मोर्शी आमदार तसेच दगडूशेठ हलवाई गणपती संस्थान,पुणे चे सरचिटणीस श्री हेमंत रासने यांचे उपस्थितीत अखिल भारतीय श्रीगुरूदेव सेवा मंडळाचे सरचिटणीस श्री जनार्दन बोथे गुरूजी व श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री हर्षवर्धन उपाख्य भैय्यासाहेब देशमुख, अमरावती यांच्या हस्ते पारबते आपलं कसं?व कलामहर्षी गौरव ग्रंथाचे प्रकाशन होणार असून यावेळी पारबते आपलं कसं? व कलामहर्षी ग्रंथ प्रकाशन होणार असून संत श्री शंकर महाराज, सय्याजी महाराज, मुन्ना महाराज,मनोजभाई, तसेच मायबाप संस्थानचे कृष्णा गिरिधर, आडकुजी महाराज संस्थानचे अभिजित बोके, लहानुजी महाराज संस्थानचे बाळासाहेब पावडे,संत अच्युत महाराज संस्थानचे डॉ अनिल सावरकर,नगाजी महाराज मठाचे बंडूभाऊ राऊत, आचार्य हरिभाऊ वेरूळकर गुरूजी,ह.भ.प.कनेरकर महाराज,नगर परिषदचे उपाध्यक्ष किशोर भगत, सामाजिक कार्यकर्त्या सौ.आसावरी देशमुख,शंकर महाराज संस्थान चे उपाध्यक्ष नंदूसेठ चव्हाण,लहानुजी महाराज मंदिर, कळमेश्वर सुनील नाथे, माणिक वाचनालयाचे अध्यक्ष भानुदास बेलूरकर,संत शंकर महाराज संस्थान चे निळकंठराव आंडे,पोरी जरा जपून कार्यक्रम प्रमुख विजयाताई मारोतकर, गावाचे सरपंच श्री राहुल शालिकराम तायडे यांच्या व ग्रामवासी जनता जनार्दनाच्या उपस्थितीत प्रमुख संपन्न होणार असून हा विदर्भाची लोककलेच्या गौरवासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन नितीन अंबादास बेलूरकर, अभिजित बेलूरकर, संभाजी उके, सुभाषराव धुर्वे, राजेंद्र जिकार, गजानन जिंकार, डॉ.सुरेश बेलूरकर,सुनील चंदनखेडे,विजय पाचघरे, ज्ञानेश्वर बेलूरकर, सुरेंद्र आमले, विक्रम मिसळकर,उध्दव बेलूरकर ,संजय आजनकर सौ.माया नांदूरकर,सौ.नंदा धजेकर यांनी केले आहे.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या