spot_img

आज जिल्हा ग्रंथालयात ग्रंथप्रदर्शनीचा शुभारंभ

 

“वाचन संकल्प महाराष्ट्राचा” उपक्रम

वर्धा, दि. 02 (जिमाका) : राज्य शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ या उपक्रमांतर्गत जिल्हा ग्रंथालयात ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. या प्रदर्शनाचे उद्घाटन आज 3 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता, जिल्हा नियोजन अधिकारी अनिरूद्ध राजूरवार यांच्या हस्ते होणार असून यावेळी जिल्हा माहिती अधिकारी रवी गिते यांची प्रमुख उपस्थितीत होणार आहे.

तरुण पिढीला प्रत्यक्ष ग्रंथ वाचनाकडे आकर्षित करण्याची आवश्यकता आहे. यासाठी उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अधिपत्याखालील असलेल्या शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांमध्ये दि. 1 ते 15 जानेवारी या कालावधीत वाचन संकल्प महाराष्ट्राचा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत ग्रंथप्रदर्शना दरम्यान चर्चा, सामुहिक वाचन, वाचन कौशल्य कार्यशाळा, वाचन संवाद, पुस्तक परिक्षण व कथन स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. नागरिक, वाचक, सभासद, विद्यार्थी, अभ्यासक यांनी मोठ्या संख्येने या उपक्रमात सहभागी व्हावे आणि ग्रंथालयाचे सभासद व्हावे असे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी नितीन सोनोने यांनी केले आहे.

 

 

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या