वर्धा, दि. 2 (जिमाका) : महाराष्ट्र राज्य दिव्यांगत्व संशोधन समितीमध्ये अशासकीय सदस्यांची नियुक्ती करण्यासाठी अर्ज मागविण्यात आले आहे.
राज्य दिव्यांगत्व संशोधन समितीमध्ये अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती करण्यासाठी दिव्यांग कल्याण क्षेत्रात कार्यरत नामवंत, तज्ज्ञ व्यक्ती व दिव्यांगांच्या स्वंयसेवी संस्थांचे प्रतिनिधीत्व करणारे पदाधिकारी व सदस्य यांची नावे शासनास सादर करावयाची आहे. त्याअनुषंगाने सात दिवसाच्या आत जिल्हा समाज कल्याण अधिकारी कार्यालयात प्रत्यक्ष भेट देऊन विहित नमुन्यातील अर्ज सादर करावा, असे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी प्रतिभा भागवतकर यांनी केले आहे.”

