spot_img

सुधीरजी दिवे यांना विधान परिषद सदस्यत्व मिळावे: आर्वी विधानसभा क्षेत्रातील कार्यकर्त्यांची मागणी*

कारंजा ( घा ) :- आर्वी विधानसभा क्षेत्रातील प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आमदार सुमितदादा वानखडे यांची भेट घेऊन वर्धा जिल्ह्यातील भूमिपुत्र राजकारणातून समाजकारण साधणारे सुधीरजी दिवे यांना विधान परिषदेच्या रिक्त झालेल्या जागांवरती विधानपरिषद आमदार म्हणून संधी मिळावी अशी मागणी केली आहे. यासाठी त्यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस, केंद्रीय मंत्री माननीय नितीनजी गडकरी, आणि महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्याशी प्रत्यक्ष भेटून चर्चा घडवून आणावी,अशी विनंती केली आहे.
कार्यकर्त्यांनी दिलेल्या निवेदनात सुधीरजी दिवे यांच्या सामाजिक योगदानाचा गौरवपूर्ण उल्लेख आहे. त्यांनी वडील स्वर्गीय वामनराव दिवे यांच्या नावाने स्थापन केलेल्या चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून 30,000 हून अधिक लोकांचे नेत्र तपासणी शिबिर आयोजित केले असून, शेकडो लोकांचे मोफत डोळ्यांचे ऑपरेशन करून चष्म्यांचे वाटप केले आहे. तसेच, अच्युत महाराज हार्ट हॉस्पिटलच्या माध्यमातून हृदयविकार तपासणी शिबिरे राबवून शेकडो हृदय शस्त्रक्रिया कमी खर्चात पूर्ण केल्या आहेत.
महिला सशक्तीकरणाच्या क्षेत्रात सुधीरजी दिवे यांनी 15,000 महिलांना शिवणकला, ब्युटी पार्लर, आणि विविध प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत रोजगारक्षम बनवले आहे. तसेच, बेरोजगार युवकांना उद्योगविषयक मार्गदर्शन व रोजगारसंधी उपलब्ध करून दिल्या आहेत.
राजकीय योगदानातील ठसा
सुधीरजी दिवे यांनी विधानसभेच्या निवडणुकीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावत वर्धा जिल्ह्यातील चारही विधानसभा क्षेत्रांमध्ये भारतीय जनता पार्टीचा विजय सुनिश्‍चित केला. विशेषतः, आर्वी विधानसभा क्षेत्रात माननीय सुमितदादा वानखडे यांना 39,000 पेक्षा जास्त मताधिक्याने विजय मिळवून देण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे.
विधान परिषद सदस्यत्वाची मागणी
आर्वी विधानसभा क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी असा ठाम विश्वास व्यक्त केला आहे की सुधीरजी दिवे यांना विधान परिषद सदस्यत्व मिळाल्यास त्यांच्या सामाजिक व राजकीय योगदानाला योग्य तो सन्मान मिळेल. त्यांच्या नेतृत्वाखाली नागपूर, वर्धा आणि अमरावती या तीन जिल्ह्यांमधील वंचित, शोषित, आणि पीडित घटकांसाठी अधिक प्रभावीपणे काम करता येईल.
कार्यकर्त्यांनी माननीय देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी, आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी प्रत्यक्ष भेट घडवून आणण्यासाठी सुमितदादा वानखडे यांना नियोजन करण्याची विनंती केली आहे. आर्वी विधानसभा क्षेत्रातील कार्यकर्त्यांच्या विनंतीला मान देऊन माननीय आमदार सुमित दादा वानखडे यांनी 26 जानेवारी 2025 पर्यंत मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस ,केंद्रीय मंत्री माननीय नितीनजी गडकरी व प्रदेशाध्यक्ष माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या प्रत्यक्ष भेटीचे नियोजन करून हा विषय लवकरात लवकर मार्गी लावू असे आश्वासन दिले सुधीरजी दिवे यांना विधान परिषदेच्या सदस्यत्वाची संधी मिळाल्यास त्यांच्या रूपाने समाजाला निष्ठावान व समर्पित नेतृत्व मिळेल, अशी सर्व कार्यकर्त्यांची भावना आहे.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या