- 
 वर्धा – सालोड (हिरापूर) येथील शालिनीताई मेघे परिचारिका महाविद्यालयात आद्यशिक्षिका व समाजसुधारक सावित्रीबाई फुले यांची जयंती विविध कार्यक्रमांचे आयोजन करीत साजरी करण्यात आली.कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला प्राचार्य डॉ. रंजना शर्मा व प्राचार्य अख्तरीबानो शेख यांच्या हस्ते माल्यार्पणाने करण्यात आली. स्त्रीशिक्षणाची मुहूर्तमेढ करताना स्त्रीमुक्तीचे आणि समाज सुधारणेचे मुख्य साधनच शिक्षण आहे, हे सावित्रीबाईंनी आपल्या कृतीतून जगाला दाखवून दिले, असे प्रतिपादन डॉ. रंजना शर्मा यांनी केले. तर, विद्यार्थिनींनी सावित्रीबाईच्या कार्यातून प्रेरणा घेऊन त्यांच्या विचारांचा वारसा पुढे चालवावा, असे मत प्राचार्य अख्तरीबानो शेख यांनी यावेळी मांडले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रतिभा वानखेडे यांनी केले वर्धा – सालोड (हिरापूर) येथील शालिनीताई मेघे परिचारिका महाविद्यालयात आद्यशिक्षिका व समाजसुधारक सावित्रीबाई फुले यांची जयंती विविध कार्यक्रमांचे आयोजन करीत साजरी करण्यात आली.कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला प्राचार्य डॉ. रंजना शर्मा व प्राचार्य अख्तरीबानो शेख यांच्या हस्ते माल्यार्पणाने करण्यात आली. स्त्रीशिक्षणाची मुहूर्तमेढ करताना स्त्रीमुक्तीचे आणि समाज सुधारणेचे मुख्य साधनच शिक्षण आहे, हे सावित्रीबाईंनी आपल्या कृतीतून जगाला दाखवून दिले, असे प्रतिपादन डॉ. रंजना शर्मा यांनी केले. तर, विद्यार्थिनींनी सावित्रीबाईच्या कार्यातून प्रेरणा घेऊन त्यांच्या विचारांचा वारसा पुढे चालवावा, असे मत प्राचार्य अख्तरीबानो शेख यांनी यावेळी मांडले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रतिभा वानखेडे यांनी केले
- 
या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी नाटिका, कविता, गीतगायन आणि वक्तृत्व यांच्या सादरीकरणातून सावित्रीबाईंच्या जीवनकार्याचा वेध घेत त्यांना मानवंदना अर्पण केली. सांगता विद्यार्थ्यांच्या सामूहिक संकल्प प्रतिज्ञेने करण्यात आली. कार्यक्रमाला महाविद्यालयातील शिक्षक, विद्यार्थी व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची उपस्थिती 

