spot_img

नाफेड मार्फत जिल्ह्यात आता पर्यंत 76213.76 क्विंटल सोयाबिन खरेदी

Ø सोयाबिन खरेदीसाठी 9004 शेतक-यांनी केली नोंदणी

Ø 3 हजार 815 शेतक-यांकडून सोयाबिनची खरेदी

वर्धा, दि.08 (जिमाका) : आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत जिल्ह्यात नाफेड मार्फत दि.15 ऑक्टोंबर 2024 पासुन सोयाबिन खरेदी करण्यास सुरवात करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसात शेतकरी नोंदणी व खरेदीच्या प्रक्रियेत वाढ झालेली आहे. आज पर्यंत जिल्ह्यात 76 हजार 213.76 क्विंटल सोयाबिन खरेदी करण्यात आली असून 3 हजार 815 शेतक-यांनी आधारभूत सोयाबिन खरेदी योजनेचा लाभ घेतला असल्याचे जिल्हा पणन अधिकारी बि.वाय. शेख यांनी सांगितले.

उर्वरीत अंदाजे 1 लाख क्विंटल सोयाबिन खरेदी होण्याची अपेक्षित असल्याने जिल्ह्यात सध्या बारदानाचा तुटवडा असल्यामुळे मुबंई येथील मुख्य कार्यालयास 2 लाख बारदान्याची मागणी नोंदविण्यात आली असून नविन बारदाना 3 ते 4 दिवसात उपलब्ध होणार असून बारदान प्राप्त होताच सोयाबिन खरेदी प्रक्रिया सुरु होणार असल्याचेही श्री. शेख यांनी सांगितले.

जिल्ह्यातील वर्धा येथील केंद्रावर 1 हजार 549 शेतक-यांनी नोंदणी केली असून 647 शेतक-यांकडून 13 हजार 270.9 क्विंटल करण्यात आली आहे. देवळी येथे 1 हजार 273 शेतक-यांनी नोंदणी केली असून 502 शेतक-यांकडून 9 हजार 402.1 क्विंटल, पुलगाव येथे 603 शेतकरी नोंदणी, 213 शेतक-यांकडून 3 हजार 763.4 क्विंटल खरेदी, कारंजा 265 शेतकरी नोंदणी 21 शेतक-यांकडून 336.1 क्विंटल खरेदी, आष्टी येथे 713 शेतकरी नोंदणी 258 शेतक-यांकडून 4 हजार 537.5 क्विटल खरेदी, हिंगणघाट येथे 1 हजार 791 शेतकरी नोंदणी 974 शेतक-यांकडून 18 हजार 758.9 क्विंटल खरेदी, समुद्रपूर येथे 1 हजार 231 शेतकरी नोंदणी 545 शेतक-यांकडून 11 हजार 830.2 क्विंटल खरेदी, जाम येथे 1 हजार 579 शेतकरी नोंदणी 655 शेतक-यांकडून 14 हजार 314.7 क्विंटल खरेदी करण्यात आली असून जिल्ह्यातील आठही खरेदी केंद्रावर एकुण 9 हजार 4 शेतक-यांची नोंदणी झाली असून 3 हजार 815 शेतक-यांकडून 76 हजार 213.76 क्विंटल सोयाबिन खरेदी करण्यात आली असल्याचे जिल्हा पणन अधिकारी यांनी परिपत्रकाव्दारे कळविले आहे

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या