वर्धा, दि.08 (जिमाका) : राज्याचे गृह (ग्रामीण) गृहनिर्माण, शालेय शिक्षण, सहकार व खनिकर्म राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर दि. 9 जानेवारी 2025 रोजी जिल्ह्याच्या दौ-यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम याप्रमाणे आहे.
दि. 9 जानेवारी 2025 रोजी सकाळी 9 वाजता नागपूर येथून वर्धा कडे प्रयाण करतील. सकाळी 9.45 वाजता वर्धा येथे आगमन. सकाळी 10.00 वाजता चरखागृह सेवाग्राम येथे आयोजित युथ फेस्टीवल कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 1.30 वाजता सेलू कडे प्रयाण करतील. दुपारी 2.00 वाजता पंचायत समिती सेलू येथील सभागृहात आयोजित सेलू तालुक्यातील पाणी टंचाई बाबत आढावा तालुक्यातील सरपंच व लोकप्रतिनिधी यांचे सोबत बैठकीस उपस्थिती.
दुपारी 3.30 वाजता सेलू येथून वर्धा कडे प्रयाण करतील. सायंकाळी 4.00 वाजता वर्धा येथे आगमन पंचायत समिती वर्धा येथील सभागृहात वर्धा तालुक्यातील पाणी टंचाई बाबत आढावा, सरपंच व लोकप्रतिधी साबत बैठकीस उपस्थिती. सायंकाळी 6 वाजता शासकीय विश्रामगृह येथे वर्धा जिल्हा परिषद कर्मचारी पतसंस्था येथील पदाधिका-यांसमवेत बैठकीस उपस्थिती व राखीव दि. 10 जानेवारी 2025 रोजी स्थानिक कार्यक्रमास उपस्थिती व सोयीनुसार नागपूर कडे प्रयाण करतील.

