spot_img

ग्रामगीतेचा संदेश देणारी रामकृष्णाची जोडी यांचा  दि.१५ व १६जानेवारीला पुण्यस्मरण पर्व 

  1. वर्धा: मानवतेचे महान पुजारी वं.राष्ट्रसंत श्री. तुकडोजी महाराज यांची ग्रामगीता आपल्या अमोघ वाणीतुन प्रबोधनातुन जनसामान्यांपर्यंत पोहचविणारे आद्य ग्रामगीताचार्य रामकृष्णदादा बेलुरकर व ग्रामगीतादास आचार्य रामकृष्ण अञे महाराज यांनी संपूर्ण आयुष्य वंदनीय राष्ट्रसंताच्या ग्रामगीतेचा रचनात्मक संदेश संपूर्ण आयुष्यभर ग्रामगीतेच्या प्रचार कार्यात व्यतीत केले .तळेगाव (शा.पतं) येथील मानव विकास ज्ञान साधनाश्रमाच्या माध्यमातून हजारो मुलांना सुसंस्काराचे धडे दिले. दोघांचे नावही रामकृष्ण, दोघांनी घेतलेला वसा सुध्दा ग्रामगीतेचा प्रचार व प्रसार या दोन्ही रामकृष्णाची अतुट असे मिञत्व दोघांचे निधन सुध्दा जानेवारी महिन्यात १० जानेवारी २०१९ आद्य ग्रामगीताचार्य रामकृष्णदादा बेलुरकर यांचे निधन तर १५ जानेवारी २०२२ ला ग्रामगीतादास आचार्य रामकृष्ण अञे बाबाचे निधन झाले. दोघांचे अंतीम संस्कार निसर्गरम्य तळेगाव (शा.पंत) येथील मानव विकास ज्ञान साधनाश्रम येथे करण्यात आले होते. पुज्य आद्य ग्रामगीताचार्य रामकृष्ण दादा बेलुरकर यांचे सहावे पुण्यस्मरण व ग्रामगीतादास आचार्य रामकृष्ण अञे महाराजांचे चौथे पुण्यस्मरण मानव विकास ज्ञान साधनाश्रम तळेगाव (शा. पंत)तालुका आष्टी जिल्हा वर्धा येथील साधनाश्रमात पुण्यतिथी पर्व विविध उपक्रमातून संपन्न होतआहेत. या पुण्यस्मरण सोहळ्यास समस्त गुरुदेव भक्त यांनी उपस्थितीत राहण्याचे आवाहन आद्य ग्रामगीताचार्य रामकृष्णदादा विचार प्रतिष्ठान नागपुर व मानव विकास ज्ञान साधनाश्रम तळेगाव( शा.पंत) यांनी केले आहे.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या