आष्टी श.:- स्वप्निल दा.पोहकार
आष्टी तालुक्यातील खंबित गावातील उमेश कुरवाडे शेतकऱ्यांच्या राहत्या घरी निघालेला नाग जातीचा साप हा खुप विषारी मानला जातो, पण शेतकरी हा असा माणुसकी जपणारा मनुष्य आहे, कि कितीतरी संकटे आली तरी तो आपल्या जीवाचा किंवा आर्थिक नुकसानीचा विचार न करता तो नेहमीच जंगली प्राण्यांवर किंवा पाळीव प्राण्यांवर प्रेम हे शेतकऱ्याला असते,पण त्यांचा विचार शासन करतं ना कुठले हि शासकिय कार्यालयातील अधिकारी किंवा कर्मचारी करतं नाही, अश्या प्रसंगी सुद्धा..सापापासून माणसाला किंवा माणसापासून सापाला जीव जाण्याचा धोका असून सुद्धा, खंबित येथील शेतकरी उमेश कुरवाडे याने आपल्या घरात निघालेल्या सापाला पकडुन जंगलात सोडून देण्याकरिता आष्टी तालुक्यातील लहान आर्वी येथील सर्प मित्र प्रितम गायकी याला फोन लावून साप पकडण्यासाठी बोलाविले व सर्प मित्र प्रितम गायकी या युवकाने कुठलाही विचार न करता आपले नेहमीच नागरिकाच्या मदतीला धाऊन जाणारे यांनी खंबित येथील शेतकरी उमेश कुरवाडे यांच्या घरातील साप पकडुन जंगलात सोडून जंगली प्राण्यांवर किंवा पाळीव प्राण्यांच्या वर असलेले प्रेम संदेश दाखवून दिला..


