
वर्धा, दि.31 जानेवारी : दिव्यांग व्यक्तींमध्ये प्रेरणा निर्माण करण्याच्या उद्देशाने, केळझर येथील गोपाल बाबुराव पवार यांनी वर्धा ते अयोध्या असा तब्बल 900 किलोमीटरचा सायकल प्रवास सुरू केला आहे. त्यांच्या या अद्वितीय उपक्रमासाठी लायन्स क्लब गांधी सिटी, बजरंग दल, प्रहार दिव्यांग संस्था यांनी आर्थिक मदत देवून यांच्यासह अनेक सामाजिक संघटनांनी पाठिंबा दर्शविला आहे.
नारायण सेवा संस्थान उदयपूर, तसेच लायन्स क्लब गांधी सिटी यांनी घेतलेल्या कृत्रिम लिंब शिबिरामध्ये त्यांना हा कृत्रिम पाय बसवण्यात आला होता. तीनदा नॅशनल, एकदा इंटरनॅशनल, तसेच जिल्हास्तरीय अनेक स्पर्धे गोपाल सहभागी झाले आहे. याआधी त्यांनी केळझर ते शेगाव 350 किलोमीटरचा प्रवास सुद्धा केला आहे.
आज सकाळी वर्ध्यातील गांधी पुतळा येथून प्रस्तान केले या विशेष समारंभात लायन्स क्लब गांधी सिटीचे अध्यक्ष आशिष पोहाणे , डायरेक्टर अनिल नरेडी, संदीप चिचाटे,चंद्रकांत डगवार , मनोज तेलहांडे, प्रमोद वाघ राष्ट्रीय बजरंग दलचे विदर्भ प्रांतीय अध्यक्ष अनुप जैस्वाल, तसेच जिल्हा ग्रंथालय अधिकारी नितीन सोनवणे व शिक्षण विस्तार अधिकारी जया परमार आणि लायन्स क्लब गांधी सिटी,बजरंग दलचे सर्व अनेक दिव्यांग बांधव यांच्या उपस्थितीत हिरवा झेंडा दाखवून या प्रवासाचा शुभारंभ करण्यात आला.
दिव्यांगांसाठी प्रेरणादायी प्रवास
गोपाल पवार यांचा हा प्रवास केवळ त्यांच्या आत्मशक्तीचा प्रत्यय देणारा नाही, तर दिव्यांग बांधवांसाठीही प्रेरणादायी ठरणारा आहे. हा प्रवास यशस्वीरित्या पूर्ण करून ते समाजासमोर एक नवा आदर्श निर्माण करण्याचा प्रयत्न करणार आहेत.
त्यांच्या या उपक्रमाला संपूर्ण समाजाकडून शुभेच्छा दिल्या जात असून, ते यशस्वीरीत्या आपल्या ध्येयापर्यंत पोहोचावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

