वर्धा, दि 10 (जिमाका) : वर्धा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे पुनरुजीवन करुन सक्षमीकरण करण्यासाठी बँकेमध्ये जिल्ह्यातील सहकारी पतसंस्था, कृषि उत्पन्न बाजार व वैयक्तिक ठेवी जमा करुन मोठा हातभार लावीत आहे सोबतच बँक इमारतीचे नुतणीकरण करण्यासाठी काही संस्था पुढे सरसावल्या आहे. या संस्था व ठेवीदारांचा सत्कार राज्याचे गृह (ग्रामीण), गृहनिर्माण, शालेय शिक्षण, सहकार व खनीकर्म राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या हस्ते दि.9 फेब्रुवारी रोजी सहकार मेळाव्यात करण्यातआला.
आर्वीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्यावतीने बँक शाखेच्या इमारतीचे उत्तम दर्जाचे नुतणीकरण केल्याबद्दल समितीचे सभापती संदीप काळे, सचिव चेतन निस्ताने यांचा सत्कार करण्यात आला. तर बँकेत ठेवी ठेवणा-या कृषि उत्पन्न बाजार समिती पुलगावचे सभापती मनोज वसु, खरेदी विक्री सहकारी संघ देवळी अध्यक्ष अमोल कसनारे, विविध कर्मचारी सहकारी पत संस्था मर्या आष्टीचे अध्यक्ष नंदकुमार वरकड, राष्ट्रीय विज कामगार ग्राहक सहकारी संस्था वर्धाचे व्यवस्थापक सुनिल विरखेडे, किशोर देशमुख, गिरीष मुंजेवार आष्टी, तसेच ओटीएस योजनेंतर्गत मोठे निरंक बिगर कर्जदार वरुण ॲग्रो ट्रेडर्सचे मोहन वानखेडे, मोक्षवीर लोहकरे यांचा सन्मान करण्यात आला. बँक सक्षमीकरण अभियानांत ठेवी जमा करण्यासाठी उत्कृष्ठ कार्य करणा-या सहाय्यक उपनिबंधक मनिषा मस्के, निशा काकडे, स्वप्नील पुराम यांचाही पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
आर्थिक संकटात सापडलेल्या बँकेचे पुनरुजीवन करण्यासाठी एक वर्षापासुन बँक सक्षमीकरण अभियान राबविण्यात येत आहे. या अभियाला जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यत 1 हजार 818 ठेवीदारांनी 12 कोटी रुपयांची ठेवी बँकेत जमा केली असून यामुळे यावर्षी 452 शेतक-यांना 2 कोटी 22 लाख रुपयांचे कर्ज वितरीत करता आले.बकेच्या आर्वी शाखेचे नुतणीकरण कृषि उत्पन्न बाजार समिती आर्वी मार्फत व देवळी शाखेचे मे इवोनिथ व्हॅल्यु स्टील कंपणी भुगावच्या वतीने करण्यात आले असून वर्धा मुख्य शाखेमध्ये वीज बचतीसाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने सोलर प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला.