वर्धा, : दखने कुणबी समाज संस्था व जय महारुद्र बहुउद्देशीय संस्थेच्या संयुक्त विद्यमाने शांती भवन येथे महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मेळाव्याचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब मिसाळ यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विमलताई रघुशे होत्या.
यावेळी समाजातील विधीज्ञ निलिमा मिसाळ यांनी महिलांच्या समस्या व उपाय यावर मार्गदर्शन केले. जयश्री गफाट यांनी समाज संघटन व महिला सबळीकरण यावर माहिती दिली. भैरवी गांडोळे यांनी मोबाईलचा वापर व सायबर सुरक्षा यावर माहिती दिली.
प्रतिभा सावध यांनी चर्चा सत्राद्वारे मार्गदर्शन केले. विमलताई रघुशे यांनी अध्यक्षीय मार्गदर्शन केले. यावेळी महिलांचे विविध मनोरंजक खेळ व स्पर्धा घेण्यात आल्या. विजेत्या स्पर्धकांना बक्षीस देण्यात आले. हळदीकुंकू व वाण देऊन कार्यक्रमाची सांगता झाली.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गुंजन मिसाळ, संध्या बावणे, सुषमा वाघ, कीर्ती मिसाळ, अरुणा बोराडे, अनिता घपाट, आरती सावध, भारती मसने, आश्विनी भालेराव, सुनिता वंजारी, प्रविणा चांभारे, प्रज्ञा नखाते, रोशनी मिसाळ, लता जाधव, विद्या ठाकरे, अरुणा बोराडे, शीतल रघुशे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सीमा गांडोळे यांनी केले. संचलन स्फूर्ती वंजारी व अमृता गायकवाड यांनी केले तर आभार गुंजन मिसाळ यांनी मानले.