अमरावती : – अमरावती जिल्ह्यात कर्करोग क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्या बद्धल अमरावती येथील वैद्यकीय क्षेत्रात लोकप्रिय व्यक्तीमत्च असणाऱ्या डॉ. माधुरीताई सदाशिवराव गाढेकर,ह्या अमरावती येथे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल येथे कर्करोग विभागात डॉक्टर म्हणून सेवा देत आहे .त्या एम बी बी एस ,एम डी असून हीमॅटो ओकालोजिस्ट आहेत,त्यांनी आता पर्यंत कर्करोग असणाऱ्या अनेक रुग्णांना या आजारापासून दिलासा दिला आहे,त्यांचे वैद्यकीय क्षेत्रातील कार्य हे उल्लेखनीय आहे. त्यांनी कोरोना काळात सुध्दा आपल्या जीवाची पर्वा न करता कोरोनाग्रस्त रूग्णांसाठी सुध्दा कार्य केलेले आहे,त्यांच्या ईलाजा मुळे अनेक कोरोना रुग्णांना जीवनदान मिळाले आहेत. .कर्करोग क्षेत्रात तर त्या पारंगत आहेत, रुग्ण कसाही असो त्याचा त्या इलाज करतात आणि त्या रुग्णाला सुध्दा आराम मिळतो, त्यांनी रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा मानून त्या कार्य करत असतात, याच त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांनी सार्वजनिक आरोग्य विभागा मार्फत पुरविण्यात येणाऱ्या विविध आरोग्य सेवा व आरोग्य कार्यक्रमा मध्ये उत्कृष्ट योगदाना बद्धल त्यांचा महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभागा मार्फत आयोजित सुंदर अशा कार्यक्रमास महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या कडून शाल, पुष्प गुच्छ, सन्मान चिन्ह ,प्रमाणपत्र देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले,त्यांनी केलेल्या आरोग्य क्षेत्रातील उत्कृष्ट अशा कार्याचा हा गौरव आहे, हा त्यांचा सन्मान नसून सर्व अमरावती करांचा सन्मान आहे,त्यांना हा सन्मान देण्यात आला त्यावेळी सुपरस्टार अभिनेता गोविंदा,तसेच मां. ना.श्री प्रकाशराव जाधव, मा.ना.श्री प्रकाशराव आबिटकर तसेच अनेक मान्यवर व्यक्तींची उपस्थिती होती त्यांना हा वैद्यकीय क्षेत्रातील मनाचा सन्मान मिळाल्या बद्दल त्यांचे साप्ताहिक विदर्भ रक्षक चे संपादक सचिन भाऊ ढगे,इंजिनियर रामेश्वरराव गाढेकर,सदाशिवराव गाढेकर, डॉ.गाढेकर, डॉक्टर नवले,प्रदीप ढवळे, जुगल ओझा,दिलीप दादा गणोरकर, ॲड.नंदेशजी अंबाडकर,देवीलाल रौराळे,विजय भाऊ येरलेकर,संतोष भाऊ चौहान,अमरसिंह ठाकूर,सतीश भाऊ प्रेमलवार,आशिष देशमुख,रत्नाकर राजूरकर,मुन्ना ठाकूर, मुन्नाभाऊ दुबे,कैलाश भाऊ ठाकूर, विक्रम पुणसे,संजय पूंनसे,नंदकिशोर झाडे, मुरलीधर कोल्हे, सुधीर हीवे, मोंटी कोल्हे,अमोल भाऊ गावनर,डॉक्टर पुंनसे, छबूताई मातकर,प्रीती ताई ढगे,नंदिनी ताई झाडे,सुरेखा ताई काळे,सुरेखा ताई गाढेकर, प्रेमाताई लव्हाळे,भूमिका ताई हिवें,अनिता ताई निंघोट,दामिनी ताई पुंनसे,सुनीता ताई बांबल, मयुरीताई राऊत,प्रगती गायनर,इत्यादींनी त्यांचे अभिनंदन केले आहे,