विशेष लेख: मातृ -पितृ पूजन म्हणजे आई वडिलांची पूजा करणे. हा दिवस पालकांचा पूजन दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवशी सर्व धर्मातील मुले आपल्या आई वडिलांची पूजा करतात आणी तिलक, हार अर्पण करून त्यांचे आशीर्वाद घेतात. हा दिवस आई वडिलांचा सन्मान करण्यासाठी, कुटुंबातील सदस्यांमधील बंध दृढ करण्यासाठी, मुलामध्ये आदर, आज्ञाधारकता आणी नम्रता यासारख्या चांगल्या मूल्यांचे आत्मसात करण्यासाठी, आई -वडिलांची पूजा व सेवा केल्याने लहाणं व्यक्तीला मोठेपण प्राप्त होते. आपल्या आई वडिलांचे पाय धुऊन, हळदी -कुंकू व फुले अक्षदा वाहून पूजा करावी. त्यांचे आशीर्वाद घ्यावेत.
ज्या प्रमाणे आपण पूजन करतो हा दिवस सुवर्ण अक्षरामध्ये असावा. कारण आपल्यात येणारे संस्कार हे आई वडिलांच्या आशीर्वादाने येत असतात. त्यामुळे समाजात कशा पद्धतीने रहावे, व्यवहार कसा करावा हे न सांगता शिकविल्या जाते. आईच मातृत्व कधी संपत नसते. तर वडील खरा आकार मुलाला घडविण्यात खर्च करीत असते. परंतु मुले मोठे झाल्यावर वा लग्नाच्या बंधनात अडकल्यावर काही मंडळी आई वडिलांना का विसरतात? हा प्रश्न निर्माण होतो. संस्कार जर आई वडील हृदयातून देत असेल तर मुलगा असा का वागतो? मग संस्कार जर आई वडिलांचे असेल तर एवढे सारे वृद्धाश्रम कसे? मग आई वडील मुलांना देण्यात काय कमी पडलेत? संस्कार जरी दिले असले तरी काही प्रमाणात बदल हा असतोच हा तर निसर्गाचा बदलच आहे. पण जुनी मंडळी त्यांचे विचार, संस्कार विसरून चालणार नाही. जुने विचार व नवीन विचार एकत्र सांगड तयार करून सांसारिक जीवन जगण्याला फार महत्व आहे. आई वडिलांकडून आपल्याला उत्तम संगोपन चालते, ती व्यक्ती तुम्ही कमाई कराल तोपर्यंत सर्व अर्पण करतो. त्यांची संपत्ती तुम्हाला पाहिजे. हिस्सा पाहिजेत नाही दिला तर कोर्ट त्यांना आपण दाखवतो. काळजाच्या तुकड्याने आई वडिलांना त्रास द्यावा व तुम्ही सुखात जगाव.मग त्यांना काहीच अधिकार नको. तुम्हाला सर्व आयुष्यात कमावलेले द्यावे व सर्व खिशे रिकामे करून जगाव. त्यांना खायला नाही हो पाहिजेत. फक्त आणी फक्त तुम्ही त्यांच्या नजरेसमोर जरी असले तरी ते सुखी राहील. आईला तर हृदय जरी मागितले तरी ती आपल्या मुलांना मागचा पुढचा विचार न करता अर्पण करते ती माऊली.
आजच्या पूजनापेक्षाही म्हातारपणीचा आधार हा त्यांना सक्षम करतो. कितीही संपत्ती कामावली तरी त्याला जर म्हातारपणी असे दुःख जर भेटले तरी तो जिंकल्या वरही हरतो. म्हणून मित्रांनो एकवेळ ईश्वर नाही आहे असे समजा पण आई वडिलांना त्रास देऊ नका. तुम्हीच त्यांचे आधार आहे. आणी पहा आज त्यावर पाळी आली तुम्हीही म्हातारे होणार, तुमचे मुले पण तुमच्यासारखी वागली तर? कमीत कमी हा विचार करून त्यांना वागणूक द्या. कारण संस्कार हे न कळत मुलगा संग्रह करतोच हे विसरून चालणार नाही. आई वडील आपले ईश्वरिय रूपे आहेत. त्यांचं पूजन आवश्यक.आई वडीलच तुमचे मंदिर आहे.
संकलन :-शेषराव गो. कडू
वरुड