spot_img

*माॅडेल हायस्कूल भारसवाडा येथे५७ वर्षाच्या तरूण विद्यार्थ्यांचे स्नेह संमेलन उत्साहात (बचपन की यादे) नावाने बहारदार कार्यक्रम.

 *भारसवाडा*:- माॅडेल हायस्कूल भारसवाडा या.आष्टी(शहीद) जिल्हा वर्धा येथील विद्यालयात तब्बल ४१ वर्षांनी १ तासाची शाळा हा आगळावेगळा कार्यक्रम इयत्ता १० वी शैक्षणिक वर्ष १९८४ ची बॅचचे वर्ग मित्रांनी स्नेह मिलन सोहळा पार पाडला.

      कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माॅडेल हायस्कूल भारसवाडा येथील मुख्याध्यापक थोटे सर माजी सेवानिवृत्त शिक्षक ढोक सर, कावळे सर, प्रभाकरराव मेने, भोयर सर यांनी प्रमुख वक्ते म्हणून मोलाचे मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सुत्र संचालन गोंधाने सर यांनी केले.याप्रसंगी माजी विद्यार्थीनीं आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला आणि उपस्थित विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.

     कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी माजी विद्यार्थी डॉ.प्रमोद लोहकरे, राहुल कोचे, अरूण खेडकर, सुनील साबळे, संजय शिंदे, नंदा गांडोळे, विनोद कडु, संजय ढगे, वनिता कावळे, ज्योती गुजर यांनी अथक परिश्रम घेऊन ४१ वर्षांनी माॅडेल हायस्कूल भारसवाडा येथे स्नेह मिलन सोहळा संपन्न झाला.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या