वर्धा :राहुल सोलापूररकर हा इतिहासाचा गाढा अभ्यासक आणि संशोधक असल्याच्या अविर्भावात अत्यंत बेताल आणि चुकीची वक्तव्ये करीत आहे. मुळातच हा एक दुर्लक्षित अभिनेता आहे.सर्वप्रथम राजे शिवछत्रपती आणि बाळ राजे संभाजी महाराज यांनी स्वतःची क्रूर औरंगजेबाच्या दरबारातून मिठाईच्या पेटाऱ्यातून मोठ्या शिताफीने आग्र्याहून सुटका करून घेतली ही एक ऐतिहासिक अभूतपूर्व घटना आहे. पण असे असतांना सुद्धा राहुल सोलापूरकर हा शिवरायांचा इतिहास पुसण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहे. त्याचबरोबर भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी वक्तव्ये ही सुद्धा निषेधार्ह आहेत. समाजाला दिशादर्शक असणाऱ्या या महापुरुषांच्या चरित्रा बद्दल हेतुपुरस्सर रित्या अपमानास्पद आक्षेपार्ह वक्तव्ये करून सामाजिक तेढ निर्माण करून शांतता भंग करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करत असल्याकारणाने राहुल सोलापूरकर या विकृत मानसिकतेच्या मनोवृत्तीला आळा घालण्याकरिता याच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करावा जेणेकरून अशा विकृत मनोवृत्तीला जरब बसावी.या कारणाने मराठा महासंघाने मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना विभागीय उपाध्यक्षा रोहिणी बाबर यांच्या नेतृत्वात,मा.पोलीस अधीक्षक, वर्धा यांच्या मार्फत निवेदन पाठविण्यात आले.निवेदन देते वेळी विदर्भ सचिव दीपक कदम, जिल्हाध्यक्षा मनीषा निकम,युवती जिल्हाध्यक्षा मोनाली मोहिते, शहराध्यक्ष विवेक जगताप,महिला शहराध्यक्ष साधना पवार,सामाजिक कार्यकर्त्या अलका भुगुल आणि नलिनी धानोरकर यांची उपस्थिती होती.