spot_img

*छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त “द हेल्पिंग हँड्स फॅमिली” तर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन*

 

वर्धा:- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त समाजसेवा आणि राष्ट्रसेवा यांचा वसा घेऊन कार्य करणारी “द हेल्पिंग हँड्स फॅमिली” संस्थेतर्फे विशेष रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे.

हे शिबिर दुर्गा माता उत्सव समिती, छत्रपती शिवाजी महाराज चौक,वर्धा येथे १९/२/२०२५ रोजी सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत आयोजित करण्यात येणार आहे. या शिबिरात दान केलेले रक्त गरजू रुग्णांसाठी उपयोगी ठरणार असून, सर्व नागरिकांनी पुढे येऊन रक्तदान करावे, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात येत आहे.

संस्थेचे अध्यक्ष श्री.अभय लांबट यांनी सांगितले की, “रक्तदान हे श्रेष्ठदान असून, एका रक्ताच्या थेंबाने अनेकांचे प्राण वाचू शकतात. त्यामुळे अधिकाधिक नागरिकांनी या सामाजिक उपक्रमात सहभागी व्हावे.

रक्तदान करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीस प्रमाणपत्र आणि अल्पोपाहार देण्यात येणार आहे. तसेच, रक्तदात्यांची नोंदणी श्री.अभय लांबट – 9765038654, श्री.अनिकेत देवढे-7507258631 श्री.शैलेश वाटेकर – 9975637135 येथे केली जाऊ शकते.

सर्व नागरिकांनी या शिबिरात सहभागी होऊन आपल्या समाजसेवेचा एक भाग बनावे, असे आवाहन “द हेल्पिंग हँड्स फॅमिली” संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या