spot_img

**संत गाडगे महाराज*

 

जन्म 23 फरवरी 1876-20 डिसेंबर 1956 निरोप ) आधुनिक मराठी संत व समाज सुधारक, त्यांचा जन्म शेनगाव दर्यापूर, जिल्हा अमरावती येथे तर आपले नाव झिंगराजी व आईचे सखुबाई, आडनाव जानोरकर त्यांचे नाव डेबुजी होते. तथापि त्यांचा वेष म्हणजे अंगावर फाटकी गोधडी आणि गाडगे असा लूक होता.लोक गोधडे महाराज किंवा गाडगे महाराज त्यांना म्हणून ओळखत. 1912 मध्ये त्यांचा विवाह झाला. त्यांचे मन रमले नाही. काही वर्षांनी घर सोडले ते फिरू लागले. समाजातील कमालीचे ज्ञान, अनिष्ट चालीरीती व अंधश्रद्धा कोणत्याही प्रकारे त्यांनी निरपेक्ष लोकसेवेचे व लोकशिक्षणाचे व्रत स्वीकारले.लहाणं पनापासूनच त्यांना भजन कीर्तनाची आवड होती. आणि ते धार्मिक व परोपकारी होते. समाज सुधारण्यासाठी व लोकशिक्षणासाठी त्यांनी प्रभावीपणे उपयोग केला.ते निरक्षर,तरीही त्यांची भाषा सुबोध व त्यांच्या हृदयाला भेदणारी होती. सर्वत्र तसेच गुजरात, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील काही भागात त्यांनी गावोगाव कीर्तन करून लोक उपक्रम केला. त्यांचा नैवेद्य उपदेश साधना व उपयुक्त लाभार्थी असाच होता. चांपी करू नये,कर्ज घेऊ नये चैन करू नये,दारू पिऊ नये, देवारे पशुंचा बलिदान देऊ नये. अशा प्रकारच्या उद्देश ते आपल्या कीर्तनात मार्मिक उदाहरणे देत. परंपरागत विषयाविषयीच व्यावहारिक व नैतिक विषयाचाही त्यांनी आपल्या कीर्तनातून लोक चालनासाठी चांगला उपयोग करून दाखवला. स्वच्छता, प्रामाणिकपणा आणि भूतदया यावर त्यांचा विशेष भर असे. तीर्थयात्रेच्या ठिकाणी ते जात व मंदिराच्या बाहेरून यात्रा सेवा करत. स्वतःच्या हाताने स्वच्छ करी खाण्यापिण्याचे अनुभवी ही त्यांचा कमालीचा साधना होता.श्रीमंत भक्तांनी दिलेले अन्न ते भिकाऱ्यांना वाटून देत आणि स्वतःची गरीबाची घरची चटणी भाकरी म्हणून खात. लहानपणापासून ते जाती-पंथ भेदात होते.जातीभेद नष्ट करून एकजिनसी समाज निर्माण व्हावा, असे त्यांना मनापासून वाटत. पंढरपूर, नाशिक, त्र्यंबकेश्वर आळंदी इत्यादी ठिकाणी यात्रे करून ते यात्रेकरूंचे अत्यंत हाल होत आहे. त्या सोयीसाठी त्यांनी धर्मशाळा बांधल्या. विदर्भातील ऋणमोचन येथे त्यांनी लक्ष्मीनारायणाचे मंदिर उभारले. आणि नदीवर घाटही बांधला अनेक ठिकाणी त्यांनी गोरक्षण संस्था उभारल्या, तसेच अनाथ आणि अपंगासाठी अनेक प्रकारे कार्य केले. समाजसेवा अनेक संस्थांना त्यांनी उदस्ते देणग्या घडवल्या. अनेक ठिकाणी देवधर्माच्या नावावर चालणारी पशुहत्या त्यांनी बंद केली. अध्यात्म जंजाळात न शिरता ही विश्वातच राहून ईश्वर भक्ती करता,अशी साधी व शिक्षनमाता त्यांनी समाजाला दिली. तुकाराम महाराज आमचे गुरु आहेत आणि माझे कोणीही शिष्य नाही असे ते म्हणत. त्यांनी म्हटल्याप्रमाणे त्यांची गादी किंवा मठ कोठेही निर्माण झाली नाही. समाज शिक्षण प्रसार करून अनेक शिक्षण संस्थांनी मदत केली. लोकांची नितांन्त श्रद्धा होती.त्यांना लोकांनी विपुल पैसा दिला. तो सर्व लोकांच्या कार्यात त्यांनी उभारलेल्या सर्व संस्थांचा कारभार विश्वस्त मंडळाचा विस्तार केला. अनेक ठिकाणी गाडगे महाराजांबद्दल बहुजन समाजात कमाल आदर भाव आहे. त्यांनी आरक्षण केलेले लोकांचे कार्य अत्यंत मोलाचे आहे. प्रवास करत असताना त्यांना अनेक अडथळे येत होते. त्यांची समाधी अमरावती येथे आहे.स्वच्छता, शिक्षण आणि अंधश्रद्धा निर्मूलनाचे महत्त्व, समाजातील दांभीकपणा पणा आणि रुढी परंपरा यावर टीका केली.गोरगरीब दिनदलीत यांच्यामधील अज्ञान अंधश्रद्धा, अस्वच्छता यांचे उच्चाटन करणे, कठोर परीश्रम,साधे राहणीमान, आणि गरिबांची निस्वार्थ सेवा,देव भोळ्या माणसापासून ते नास्तिकापर्यंत कोणत्याही वयोगटातील लोकांना आपल्या कीर्तनात सहजपणे गुंतवून ठेवत. आपले तत्वज्ञान पटवून देत.संत गाडगेबाबा हे समाज सुधारक होते. त्यांनी कीर्तनातून स्वच्छता शिक्षण आणि अंधश्रद्धा निर्मूलनाचे महत्त्व सांगितले गावागावात जाऊन त्यांनी लोकांना स्वच्छता शिकवली. अंधश्रद्धा दूर केली. त्यांचे उपदेशही साधे सोपे असतात. चोरी करू नका, सावकाराकडून कर्ज काढू नका, देवाधर्माच्या नावाखाली प्राण्याची हत्या करू नका, जातीभेद, अस्पृश्यता, पाळु नका असे ते आपल्या कीर्तनातून सांगत.देव दगडात नसून तो माणसात आहे हे त्यांनी सर्वसामान्यांच्या मनावर बसवण्याचा प्रयत्न केला. तिर्थी धोंडापाणी देव रोकडा सज्जनी! असे सांगत दिन,दुबळे,अनाथ, अपंगाची सेवा करणारे थोर महापुरुष होते. देवळात जाऊ नका, मूर्ती पूजा करू नका,अडाणी राहू नका, पोथी -पुराणे,मंत्र -तंत्र देवदेवस्की,चमत्कार असल्या गोष्टीवर विश्वास ठेवू नका. अशी शिकवण आयुष्यभर त्यांनी लोकांना दिली. गरिबांची निस्वार्थ सेवा करा त्यांनी आपले विचार साध्या आणि भोळ्या लोकांना समजावण्यासाठी ग्रामीण भाषेचा प्रामुख्याने वऱ्हाडी बोलीचा उपयोग केला. त्यांनी लोकांची विचारसरणी शुद्ध करण्याचं काम केलं. त्यांनी माणसापासून ते कोणत्याही वयोगटातील लोकांना आपल्या कीर्तनात सहजपणे गुंतवून ठेवले.एका निरक्षर माणसाने शिक्षणाचे महत्त्व पटवून द्यावे,नव्हे त्यासाठी अनेक कृती कार्यक्रम हाती घ्यावेत,ही गोष्टच महाराष्ट्राच्या इतिहासात अभूतपूर्व अशी आहे! गोपाला, गोपाला, देवी की नंदन गोपाला.असे भजन कीर्तन करत आधी अगदी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊन जनजागृतीचे विलक्षण कार्य करणारे गाडगेबाबा महाराष्ट्रातील लोकशिक्षणाचे चालते बोलते विद्यापीठ होते.विज्ञानाच्या आधारित समाज प्रबोधन करणारे ते एक महापुरुष होते. महाराष्ट्रातील बहुजन समाजाच्या उद्धारासाठी आपले संपूर्ण जीवन व्यतीत करणारे गाडगेबाबा विसाव्या शतकातील हा एक महान क्रांतिकारक अवलिया फकीर होते. सर्वसामान्य जनतेला निर्मळ माणुसकीचा एक नवा आचारधर्म शिकवणारे ते विलक्षण लोकसेवक होते. तब्बल बारा वर्षे महाराष्ट्रात त्यांनी भ्रमंती केली. देहाची आसक्ती कसोटीवर घासून घासून बोथोड केली. आणि विलक्षण संताने खऱ्या मानव धर्माचा शोध सुरू केला. 1905 ते 1956 अशी तब्बल पन्नास वर्षे बहुजन समाजाच्या उद्धारासाठी आपली हयात खर्ची घातली.बहुजन समाजात पसरलेले सर्व सामाजिक रोग, कर्मकांड, धर्ममार्तंडाचे वर्तन याचे चिंतन केले. सर्व सामाजिक, धार्मिक, समस्यांची अगदी शास्त्रीय पद्धतीने चिकित्सा केली आणि एक नवा मानवधर्म नवा प्रगत समाज निर्माण करण्यात यशस्वी केला. हा बहुजन समाजात किती अंधश्रद्धा आहे काय अंधश्रद्धा याची अनुभवानिष्ठ चिकित्सा केली. या स्थरावरील लोक त्यांनी पाहिली अनुभवले प्रचंड दारिद्र निरक्षरता अंधश्रद्धा इत्यादी समस्या असे कसे निराकरण करता येईल याचा त्यांनी जणू ध्यास घेतला. माणसेच माणसांना का दुःख देतात. माणसेच माणसाचे एवढे शोषण का करतात. माणसा माणसा शिवा शिव का पडली जाते. लक्षावधी लोक भुके का आहे अशा अनंत प्रश्नांचे गाडगेबाबा भोवती काहूर उभे टाकले.या सर्व समस्यांची सोडवणूक करून एका शोषणमुक्त समाजाच्या उभारणीचा त्यांनी संकल्प केला. आपल्या कीर्तनातून वरील समस्यांना हात घालून जनजागृतीचे महान कार्य केले वंचित दुःखी बहुजन समाजाला हिम्मत देणारे विचार मांडले आणि लोकशिक्षणाची एक चळवळ उभी केली. गाडगेबाबांच्या काळात संपूर्ण महाराष्ट्रात कर्मकांड, अंधश्रद्धा यांचा अतिरेक झाला होता. बहुजन समाज भरडून निघत होता.तेव्हा या समाजवादी सत्यशोधकाने एकेश्वरवादी तत्त्वज्ञान मांडले ग्रंथ प्रामाणिक पोथी, निष्ठता,सन, श्राद्ध, मूर्ती पूजा यावर कठोर प्रहार करून ज्ञानप्रसारांचे आगळे वेगळे आंदोलन उभे केले. गावोगाव कीर्तन भजन करून समाजप्रबोधनाचा नवा अविष्कार प्रस्थापित केला. गाडगे बाबा आपल्या कीर्तनात अध्यात्म सांगण्याऐवजी भौतिक समस्यांना बोट ठेवून विज्ञान संघ ते म्हणा भावांनो परमेश्वर एक आहे. तो निर्विकार आहे हे धर्माची देवडी व देवळांचा धर्म थोताड आहे या दगडी देवांची पाय रगडू नका यासाठी आपल्या कीर्तनातून संत कबीराचा दोहा सांगा जत्रा पुणे पत्रा विधाया तीर्थे बनाया पाणी भाई दुनिया बडी दिवाणी येतो पौषिकी धुलधानी या यात्रा जत्रा म्हणजे भोळ्या बहुजन जनतेची लूट करण्याची ठिकाणी आहे मग पुढे मनात अरे देव मंदिरात नाही ही माणसात आहे भुकेल्यांना अन्न द्या अडाण्यांना ध्यान द्या इथेच परमेश्वर आपल्या कीर्तनात ते म्हणा पाप हो मुक्या प्राण्यांचे बळी देऊन माणूस कधी सुखी झाला आहे काय परमेश्वर प्रसन्न झाला आहे काय अरे शेळीच्या लेकराचा जीव घेऊन तुम्हाला लेकरू कसे होईल माय माऊली नो हा अधर्म आहे. गाडगेबाबा धर्माची चिकित्सा करत लोकांना अगदी पोट तिडकेने सांगीतलें की बळी प्रथा कोणत्याही धर्मग्रंथात सांगितले नाही लोकांना सोपा भाषेत ते पटवून सांगत.तुकोबांचा अभंग म्हणत नवसे कन्या पुत्र होती!मग का करणे लागे पती!! पुन्हा कबीरांचा दोहा सांगत,मांस -मांस सब एकही है!मुर्गा -बकरा -गाय, ऐसा मानव चुतिया बडा प्रेमसे खाय, आपने बेटे का सिर मुंडावे देख सुरा लग जाए, दुसरो की तो गर्दन काटे जरा शरम न आए. गाडगेबाबांनी नवस या अंधश्रद्धे विरुद्ध प्रचंड जनजागृती केली त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या कुटुंबांना उपयोगी येणाऱ्या प्राणीमात्रांची रक्षणाची मोहीम राबवली बंद करण्यासाठी प्रसंगी प्राण पणाला लावले.संत गाडगेबाबा यांच्या जयंती निमित्य विनम्र अभिवादन….

  1. संकलन :-शेषराव गो. कडू
  2. वरूड जिल्हा अमरावती

मो. नं. 9923988734

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या