आर्वी,दि.२३:- भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नेते अनंतराव बाबूजी दादा मोहोड यांच्या वाढदिवसा निमीत्त काँग्रेस कमेटीच्यावतीने सोमवारी (ता.२४) विधानसभा क्षेत्रातील आर्वी, आष्टी, कारंजा तालुक्यात भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
आर्वी तालुका काँग्रेस कमेटीच्या वतीने माहेश्वरी भवन आर्वी येथे व कारंजा(घाडगे) काँग्रेस कमेटीच्यावतीने गुरुदेव सेवा मंदिर कारंजा( घाडगे) येथे तर आष्टी तालुका काँग्रेस कमेटीच्या वतीने शहिद स्मारक आष्टी येथे भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले असुन या तिन्ही ठिकाणी एकाच वेळी सकाळी १० ते ३ वाजेपर्यंत रक्तदात्यांना रक्तदान करता येणार आहे. इर्विन हॉस्पीटल अमरावती व जिएमसी नागपुरची चमू रक्त गोळा करणार आहेत. या रक्तदान शिबीराचा लाभ परिसरातील सर्व रक्तदात्यांनी घेवुन आम्हाला सहकार्य करावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे