spot_img

**श्री यंत्र मंदिर प्राणप्रतिष्ठा व नवकुंडी महायज्ञ सोहळ्याचा भव्य आयोजन**

आर्वी : धर्म, भक्ती आणि ज्ञान-विज्ञान संस्कारांचा अपूर्व संगम साधणारे आणि आध्यात्मिक ऊर्जा प्रदान करणारे भारतीय वैदिक परंपरेतील सर्वात शक्तिशाली यंत्र म्हणजे “श्री यंत्र” होय. सकल मानव जातीच्या आध्यात्मिक आणि नैतिक उन्नतीसोबतच भौतिक इच्छांची पूर्तता करून मानवी जीवन अधिक सुखी व समृद्ध करण्याची अद्भुत क्षमता या “श्री यंत्रा”मध्ये वसलेली आहे.

या पवित्र “श्री यंत्र”च्या आकारातील 61 फूट उंच असलेले भारतातील वैशिष्ट्यपूर्ण मंदिर पूर्णत्वास आले आहे. या भव्य मंदिरात श्री रेणुका देवीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा संपन्न होणार असून, त्या निमित्ताने विविध धार्मिक, आध्यात्मिक आणि संकीर्तनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

माजी नगराध्यक्ष प्रशांत सव्वालाखे यांच्या संकल्प -परीकल्पना व संयोजनात होणारा हा मंगलमय सोहळा 28 फेब्रुवारी ते 7 मार्च दरम्यान संपन्न होणार आहे. यावेळी ज्ञान पीठाधीश्वर श्रीमहंत श्री स्वामी सर्वेश्वरानंद सरस्वतीजी महाराज (श्रीकृष्ण आश्रम, बृजघाट गढमुक्तेश्वर) आणि साध्वी मृदुल दीदी (परमार्थ आश्रम, हरिद्वार) यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.तर नवकुंडी महायज्ञ मुख्य पुरोहित आचार्य महेशचंद्र व्यास तेलंगणा तसेच पुरोहित श्री कल्पेश दवे आर्वी तथा विद्वान ब्रह्मवृंदांच्या पौरोहित्यात व 171 यजमानांच्या हस्ते संपन्न होणार आहे.

सोहळ्याचे विशेष आकर्षण म्हणजे दि.

– **28 फेब्रुवारी**ला श्री रेणुका देवी मूर्तीची भव्य शोभायात्रा तसेच

– **28 फेब्रुवारी ते 6 मार्च**: नवकुंडी महायज्ञ,

– **6 मार्च** श्री रेणुका देवी मूर्तीची श्रीयंत्र मंदिरात प्राणप्रतिष्ठा व

– **7 मार्च**ला महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

श्री यंत्र मंदिर श्री रेणुका देवी मंदिर प्राणप्रतिष्ठा व नवकुंडी महायज्ञ सोहळा समितीच्या सदस्यांनी भाविकांना सहकुटुंब या पवित्र व मंगलमय सोहळ्याचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.

समितीचे सर्वश्री सुरेश सरोदे, वैभव सव्वालाखे, पुंडलिक अवथले, कैसर अन्सारी, गौरव जाजू, मोरेश्वर देशमुख, मोहन चांडक, बाळाभाऊ कोंडलकर, गजानन कोंडलकर, बंडुभाऊ कोंडलकर, विलास भोळे, हितेंद्र शिंदे, मयूर पोकळे, अनिल मोरे, अश्विन शेंडे, वैभव फटींग, नानासाहेब देशमुख, नंदू इरावार, अनिल लांडगे, मनीष जोशी महाराज, सूरज वैभव देऊळकर,विजय गिरी, सोनकुसरे, संजय थोरात, दिनेश सोलंकी, मुरली तिवस्कर, आकाश सोळंकी,संजय लोखंडे, सुनिल लोखंडे, सचिन डुकरे,सौ.वर्षा चोरे, सौ.शुभदा सव्वालाखे, सौ. प्रियंका सव्वालाखे,सौ.अंजली लोखंडे आदी सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेत आहे.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या