वर्धा :शेतकऱ्यांच्या मागण्यांकरीता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी व शेतकऱ्यांच्या हक्कासाठी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ३ मार्च २०२५ रोजी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे वतीने राज्यभर आंदोलन करण्याचा निर्धार केला आहे.
याच पार्श्वभूमीवर वर्धा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने उद्या ३ मार्च २०२५ रोज सोमवारला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महात्मा गांधीच्या पुतळ्याजवळ दुपारी ११ ते ३ या वेळात धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. तरी जिल्हातील शेतकऱ्यांनी जात,धर्म,पक्ष विसरून फक्त शेतकरी म्हणून जास्तीत जास्त संख्येने या आंदोलनात उपस्थित राहावे. असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अनंत बाबूजीदादा मोहोड व जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मनोज चांदूरकर तसेच वर्धा जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष चंद्रशेखर जोरे व सर्व काँग्रेस सेलचे अध्यक्ष व पदाधिकारी यांनी आवाहन केले आहे.