spot_img

**नामदेव लक्ष्मण ढसाळ*यांना सेंसार बोर्डही विसरलेत!

नामदेव ढसाळ हे कवी, विचारवंत, दलित साहित्यात परिवर्तन घडवणारे लेखक आणि बौद्ध दलित चळवळीतील नेते होते. महानगरीय जीवनावर लिहिणारे आणि बोली भाषेत लेखन करणारे ते मराठीतले एक महत्त्वाचे लेखक होते. दलित समाजात कविताच्या माध्यमातून जनजागृती त्यांनी केली.

नामदेव ढसाळ यांचा जन्म 15 फेब्रुवारी 1949 रोजी पुणे जिल्ह्यात खेड तालुक्यात कनेरसशेजारच्या पूर या एका लहानश्या खेड्यात झाला. त्यांच्या घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने लहानपणीच ते वडिलांसोबत मुंबईला आले. मुंबईतील गोलपिठा या वस्तीत त्यांचे बालपण गेले. नामदेव ढसाळानी मुंबईमध्ये अनेक वर्ष टॅक्सी चालवली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा त्यांचेवर मोठा प्रभाव होता.

त्यांनी काव्य, गद्य, वृत्तपत्रातील स्तंभ लेखन यातून आंबेडकरांचे क्रांतिकारी विचार मांडले.त्यांच्या क्रांतिकारी साहित्याची दखल जागतिक पातळीवरही घेतली गेली. ई. स.1973 मध्ये त्यांचा पहिला कवितासंग्रह गोलपिठा प्रकाशित झाला.मूर्ख म्हाताऱ्याने डोंगर हलवले हा माओवादी विचारावर आधारित, तर प्रियदर्शनी हा त्यांचा इंदिरा गांधी यांच्या विषयीचा कवितासंग्रह आहे. तसेच खेळ हा शृंगारिक कवितांचा संग्रह आहे.

ढसाळ यांनी साहित्याच्या माध्यमातून दलितांच्या व्यथा, वेदनांना प्रसिद्धी दिली. महाराष्ट्र आणि भारताला प्रभावित करणाऱ्या “दलित पॅथर” या आक्रमक संघटनेचे ते संस्थापक अध्यक्ष होते. या संस्थेची स्थापना 1972 मध्ये दलित चळवळीतील समवयस्क सहकाऱ्यांच्या व साहित्यिकासह केली. या संघटनेवर अमेरिकेतील ब्लॅक पॅथर चळवळीचा प्रभाव होता. या संघटनेद्वारा ढसाळ यांनी दलितांच्या अनेक प्रश्नांवर उग्र आंदोलने केली व तत्कालीन सरकारांना दलित हिताच्या भूमिका घेण्यास भाग पाडले. कालांतराने या चळवळीत फूट पडल्यावरही ढसाळ दलित हे पैथर1949मध्येच राहिले. मराठा विद्यापीठ नामविस्तारामध्ये त्यांची महत्त्वाची भूमिका होती.

दलित चळवळीला त्यांचे महत्त्वाचे योगसदान आहे. 1960 नंतरच्या कवी मधील प्रमुख कवी समजले जातात.त्यांनी विशिष्ट शैलीने मराठी कवितेत मोलाची भर घातली. त्यांनी भाषिक दृष्ट्या प्रमाण मराठी भाषेपेक्षा वेगळी भाषा वापरली. त्यांच्या लिखाणावर लघु नियतकालिकांचा, मनोहर ओक यांच्या तर काही प्रमाणात दिलीप चित्यांचा प्रभाव दिसतो.त्यांच्या कृतीमध्ये वेदना, विद्रोह आणि नकार हा स्थायीभाव आहे.नामदेव ढसाळ आयुष्याची शेवटची अनेक वर्ष दुर्धर आजाराने ग्रस्त होते. याशिवाय त्यांना कॅन्सरचा आजारही जडला होता.13 जानेवारी 2014 रोजी मुंबई हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले होते.

15 जानेवारी 2014 रोजी पहाटे त्यांनी जगाचा निरोप घेतला. ते तेव्हा 64 वर्षांचे होते. 16 जानेवारी 2014 ला आंबेडकर महाविद्यालयाच्या प्रांगणात अंत्यदर्शनासाठी ठेवल्यानंतर, चैत्यभूमी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यांच्या अनेक कविता आहे गोलपिठा,खेळ,तुझे बोट धरून चाललो आहे मी, तुम्ही इयत्ता कंची, या सत्तेत जीव रमत नाही, निर्वाना अगोदरची पिडा,चिंतन पर लेखन सर्वकाही समष्टीसाठी, आंबेडकरी चळवळ, आंधळे शतक,तर कादंबरी निगेटिव्ह स्पेस, हाडकी हाडवळा, उजेडाची काडी दुनिया, नाटकांमध्ये अंधार यात्रा अशी अनेक पुस्तके त्यांची आहे.

नामदेव ढसाळ यांच्या निधनानंतर त्यांच्या स्मृतीै तेवत ठेवण्याच्या ईराद्याने वैभव छाया आणि इतर समविचारी मित्रांनी नामदेव ढसाळ स्मृती गौरव समितीची स्थापना करून ढसाळ यांना एकूण आयुष्याला सलाम करणारा सारे काही समस्तीसाठी हा अभिवादनपर कार्यक्रम 15 जानेवारी रोजी दरवर्षी साजरा केला जातो.या कार्यक्रमात आंबेडकरी कविता,ढसाळ यांच्या कविताचे वाचन,त्यांच्या कवितांचे नाट्यरूप, लिहिलेल्या गाण्यांची सादरीकरण, त्यांच्या जीवनावर व कविता वर आधारित चित्र प्रदर्शन, चित्रकविता प्रदर्शन,त्यांची शाहीरी, कविता वाचन, चर्चासत्र अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते.

सारं काही समस्तीसाठी या हा ढसाळ यांच्या सन्मानार्थ आयोजित केला जाणारा एक महोत्सव आहे. समस्तीचा ढोबळ अर्थ म्हणजे सर्वांसाठी परंतु कवी वैभव छाया हे नामदेव ढसाळ यांच्या काव्यपंक्तीतून अर्थ सांगतात, हीच खरी समष्टी या संकल्पलेचींउत्पत्ती,व्युत्पत्ती आणि व्याख्या असावी. हे सारे विश्वव्यापी गळूप्रमाणे फुगू द्यावे ,अनाम वेळी फुटू द्यावे, रिचू द्यावे,नंतर उरल्या सुरल्यांनी कुणालाही गुलाम करू नये,लुटू नये काळा गोरा म्हणू नये तु ब्राह्मण, तू क्षत्रिय,तू वैश्य, तू शूद्र असे हिणवू नये. आभाळाला आजोबा आणि जमिनीला आजी माणून त्यांच्या कुशीत गुण्यागोविंदाने राहावे.

चंद्रसूर्य फिकेपडतील असे सचेत कार्य करावे. एक तीळ सर्वांनी कांडून खावा, माणसावरच सूक्त रचावे .माणसाचेच गाणे गावे माणसाने. दलित तसेच गोरगरिबावरील अत्याचाराविरोधात दलित पॅथर सारख्या चळवळीतून विद्रोहाची तलवार उपसत आपल्या साहित्याद्वारे समाजाला आरसा दाखवणारे विद्रोही कवी पदमश्री नामदेव ढसाळ यांच्या जीवनावर आधारलेला “चला हल्लाबोल” चित्रपटाला सेंसार बोर्डाने चित्रपटातील सर्व कविता काढून तो प्रदर्शित करण्याची अट सेन्सर बोर्डाने निर्मात्यावर ठेवली. धक्कादायक म्हणजे कोण नामदेव ढसाळ? त्यांना आम्ही ओळखत नाही.असे चित्रपटाचे दिग्दर्शक महेश बनसोडे यांनी सांगितले.पहा अनेक पुरस्कार भेटलेले साहित्यिक, कवी लेखक यांना जर सेंसार बोर्ड ओळखत नसेल तर आपला महाराष्ट्र कोठे आहे हे कळेल मित्रांनो. सरकारने अनेक बाबतीत पुरस्कृत केलेले तज्ञ यांना जर ही मंडळी पुसून टाकत असेल तर कोठे आहोत आपण हे कळेल.

चित्रपट प्रदर्शित करा नाहीतर नकारा काही फरक पडणार नाही. पण ज्यांचे साहित्य चित्रपटात दाखल केले त्याना आपण ओळखतच नाही हे बर नव्हे. साहित्यिकांची वाट लावली या लोकांनी.जाणून बुजून केलेली खोडी यांना सरकारनी दम द्यावयास हवा. सर्वधर्मसमभाव यालाच म्हणाच आम्ही. आदर हा सर्व तज्ञ, विचारवंत, साहित्यिक, कवी, लेखक यांचा असावाच. यांचे विचार जर तरुण पिढी घेऊन चाललेत तर देशाच्या विकासाचं पाऊल पुढे पडतेय. हे विसरून चालणार नाही. जय महाराष्ट्र….
शब्दांकन:शेषराव गो. कडू
मो. नं.9923988734
वरुड जिल्हा अमरावती

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या