कविता
माय बापाने उपसून उपसून कष्ट केले, पोटाला चिमटा घेऊन संसार केला! रक्ताचे पाणी करून शेती पीकविली,
सुदृढ परिस्थिती झाली आता आमची, सर्वांचे लग्न झाले!माय बापाला नातवंड झाले, मधातच कोम फुटला एका भावाने हिस्साच मागविला!!
पंचांना बोलावले पण शेती जसे घेत गेले मायबाप, तसेच मुलांच्या नावे करत गेले!हिस्से कसे करणार मोठा प्रश्न उभा राहिला!नावाने असलेली जमीन भावाने घेतली, सगळे उत्सुक होते हिस्सेसाठी! माय बाप केविलवाने आमच्याकडे पाहत होते!किरकिर करता करता हिस्से झाले, दुःख शिल्लक माय बापाला दिले!त्यांचाच त्यांना हिस्सा दिला केविलवाने करीत होते बिचारे,
मग माझ्यावर पाळी आली!सोने नाणे घर शेती प्लॉट सर्व काही वाटून झाले, माय बापाची पाळी आली!पंचासह माझ्यावर सर्वांची नजर गेली, तुझ्याकडे माय बाप राहील पंचांनी माझ्याच माय बापाचे हिस्से केलेत!
माझ्याकडे आले माय बाप,माझी बायको खूष मिबी खूष!
ईश्वरिय शक्ती आली माझ्याकडे, गाडी, घोडी, शेती,प्लॉट गुर, ढोर मोठे बंधू कडे!
तरीही हरकत नाही आखरी ईश्वर माझ्या वाट्याला, सेवा हेच माझे कर्म!माय बाप माझ्या वाट्याला!
फळ मिळेलच रे तुला, सपन पडले होते मला!तुझा हिस्सा तुला मिळेलच रे तुला!!
पण शेवटी माय बाप आले माझ्या वाट्याला!!शेवटी माय बापाने काय कामावले, सुरवातही शून्याने केली, शेवटी शून्यच मिळाले!पण माझ्या वाट्याला शेवटी माय बाप आले!
शेवटी माय बाप माझ्या वाट्याला!!
शेषराव गो. कडू
वरुड