संपूर्ण अमेरिका आणि युरोप सहित जवळजवळ संपूर्ण जगभराच्या स्त्रियांना 20व्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत मतदानाचा हक्क नाकारलेला होता. पुरुषप्रधान व्यवस्थेतील स्त्री पुरुष विषमतेचे हे एक धडधडीत उदाहरण या अन्यायाविरुद्ध स्त्रिया आपापल्या परीने संघर्ष करीत होत्या. 1890 मध्ये अमेरिकेतील मतदानाच्या हक्कासंदर्भात अमेरिकेत असोसिएशनचीं स्थापन झाली. परंतु हे असोसिएशन सुद्धा वर्ण विषयी आणि स्थलांतरीता विषयी पूर्वग्रह असणारी होती. दक्षिणेकडील देशांना काळ्या मतदात्यापासून वाचवण्याकरता स्त्रियांना मतदानाचा हक्क मिळायला हवा अशा प्रकारचे आवाहन त्या करीत होत्या. मर्यादित हक्कांना बहुसंख्य कृष्णवर्णीय लोकांनी आणि देशांतरीत कामगार स्त्रियांनी जोरदार विरोध केला. आणि क्रांतिकारी मार्क्सवाद्यांनी केलेल्या सार्वत्रिक प्रौढ मतदानाच्या हक्काच्या मागणीला पाठिंबा दिला. 1907 साली पहिली आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला परिषद भरली. त्यामध्ये या कम्युनिस्ट कार्यकर्त्यांनी सार्वत्रिक मतदानाचा हक्क मिळवण्यासाठी संघर्ष करणे ही समाजवादी स्त्रियांची कर्तव्य आहे अशी घोषणा केली. 8 मार्च 1908 रोजी न्यूयॉर्कमध्ये व स्त्री कामगारांनी रोड गर्ल्स चौकात जमून प्रचंड मोठी ऐतिहासिक निदर्शने केली. 10तासांचा दिवस आणि कामाच्या जागी सुरक्षितता,व मतदानाचा हक्क या मागण्या केल्या. या मागण्या बरोबरच लिंग वर्ण मालमत्ता आणि शैक्षणिक पार्श्वभूमी निरपेक्ष सर्व प्रवृत्त स्त्रीला मतदानाचा हक्क मिळावा अशी मागणी ही जोरकसपणे केली. अमेरिकन कामगार स्त्रियांच्या या व्यापक कृतीने लारा अतिशय प्रभावीत झाली. 1910 साली ओपन हेगम येथे भरलेल्या दुसऱ्या आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला परिषदेत 8 मार्च 1908 रोजी अमेरिकेतील स्त्री कामगारांनी केलेल्या ऐतिहासिक कामगिरीच्या स्मरणार्थ 8 मार्च जागतिक महिला दिन म्हणून स्वीकारावा, असा तो ठराव लाराने मांडला तो पास झाला. त्यानंतर युरोप, अमेरिका वगैरे देशात सार्वत्रिक मतदानाच्या हक्कासाठी मोहिमा उघडल्या गेल्या. त्याचा परिणाम म्हणून 1998 साली इंग्लंडमध्ये व अमेरिकेत या मागण्यांना महिला दिन हा दरवर्षी 8 मार्च रोजी साजरा केला जातो. महिला हक्क चळवळीतील केंद्रबिंदू म्हणून हा दिवस पाळला जातो. हा दिवस लिंग समानता, पुनरुत्पादक हक्क आणि महिला वरील हिंसा आणि अत्याचार यासारख्या मुद्द्यावर लक्ष केंद्रित करतो. सार्वत्रिक महिला मताधिकार चळवळीमुळे उत्तेजित असणारा हा दिवस 20व्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात उत्तर अमेरिका आणि युरोप मधील कामगार चळवळी मधून सुरू झाला. 28 फरवरी 1909 रोजी त्यातील सोशालिस्ट पार्टी ऑफ अमेरिका ने आयोजित केलेला महिला दिन हा सर्वात पहिला दिवस होता. त्यामुळे 1910 च्या आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला परिषदेत जर्मन प्रतिनिधींना विशेष महिला दिन दरवर्षी आयोजित करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात प्रेरित केले. पण यावेळी कोणतीही निश्चित तारीख ठरली नाही आपल्या स्त्रीत्वाचा अभिमान बाळगून त्याचा गौरव करण्याचा दिवस आहे. तिच्या मूळ हे जग पाहण्याची महिला दिवस 8मार्च रोजी घडला. महिलांच्या कार्याचा जागर हा दिवस असतो फुल व फुलांची पाकळी तरी स्त्रीचा सन्मान करता यावा म्हणून प्रत्येक जण आपल्या स्त्रीला काही खास देत असतो. पण रूपाने देताना नाही आले तरी शब्द भागी स्वतःहून ती आनंद जाईल.स्त्री म्हणजे वाशल्य, स्त्री म्हणजे मातृत्व, स्त्री म्हणजे प्रत्येक क्षणाची साथ, स्त्री म्हणजे कर्तुत्व, स्त्री म्हणजे अडथळे वर मात अशा अनेक रुपी आणि बहीण मैत्री सर्व स्त्रीशक्ती आंतरराष्ट्रीय महिला दिन महिलांच्या सामाजिक आर्थ िक संस्कृती आणि राजकीय कामगिरीचा उत्सव साजरा करणारा जागतिक दिवस आहे.हा दिवस लैंगिक समानतेला गती देण्यासाठी कृती करण्याचे आवाहन देखील करतो महिलांशी संबंधित विशेष मुद्दे घेऊन त्यावर काम करणे त्यांच्या हक्काबद्दल बोलणे हा महिलांचा दिवसाच्या हेतू आहे. दरवर्षी यावर यासाठी विशेष थीम देखील निवडली जाते.आंतरराष्ट्रीय महिला दिन देशभरात वेगवेगळ्या स्वरूपात साजरा केला जातो आंतरराष्ट्रीय महिला दिन हा एक जागतिक कार्यक्रम आहे. जो सामाजिक आर्थिक सांस्कृतिक राजकीय क्षेत्रातील महिलांच्या कामगिरीचा उत्सव साजरा करण्यासाठी समर्पित आहे.महिलांच्या हक्कासाठी सुरू असलेल्या लढ्यातील या दिवशी संपूर्ण जग महिला दिवस साजरा करतो हा दिवस महिलांसाठी खूप खास मानला जातो. त्यांच्या समान हक्कांना आणि समानतेला प्रोत्साहन देते. त्यांच्या कामगिरीवर प्रकाश टाकतो आणि महिला सक्षमीकरणाला प्रोत्साहन देतो या दिवशी विविध ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. आज महिला स्वतःला चांगल्या प्रकारे व्यक्त करू शकतात.मात्र पूर्वी असं नव्हतं,पूर्वीच्या काळात महिलांना ना शिक्षण, ना नोकरी, मतदानाचा अधिकार नव्हता, कमी तासाची नोकरी, चांगल्या पगाराची नोकरी मिळाली व मतदानाचा अधिकार मिळावा या प्रमुख गोष्टीच्या मागण्यासह मोर्चा काढण्यात आला होता. हा दिवस 8 मार्च 1975 मध्ये संयुक्त राष्ट्रांनी या दिवसाला मान्यता दिली. जागतिक महिला दिन सन्मान देण्यासाठी महिला सशक्तिकरण आणि मुलांमध्ये मुला-मुली मधील भेदभाव दूर करण्याच्या उद्देशाने हा दिवस साजरा करण्यात येतो.पूर्वी सती जाने, मुंडन करणे, मंदिरात प्रवेश नसने, शिक्षण न देणे, फक्त चूल आणी मुलं अशी प्रथा होती. समानता आपण कशाला म्हणतो, समानता म्हणजे स्त्री बरोबर पुरुष बरोबरीने काम करणे. जुन्या प्रथा बंद करण्याचे काम विचारवंतांनी केले. व त्या महान व्यक्तीने खरा विकास स्त्रीचा केला.पण एवढे जरी आपण स्त्रीची वाहवाह केली, पण ती खरच स्वतंत्र झाली का? तर अजून नाही. असे म्हटल्या जाते की अजूनही स्त्रीचा काळ बदललेला नाही अजून कमीत कमी 50वर्ष पुरुषाच्या बरोबरीने यायला लागेल. कारण अजूनही आमच्या देशात काही समाजात स्त्रीला महत्वाची जबाबदारी दिली जात नाही. बंधन आड येऊन तिला समोर जाऊच देत नाही. अजून भरपूर बंधने तिच्यावर लादलेलेआहेत. समानता केव्हा येईल तर नोकरीं, कोणतेही काम, समान हक्क मिळेल व तिच्यावर अन्याय होईल नाही तेव्हाच हे शक्य आहे. समाजात आजही भरपूर फरक आवश्यक आहे. तिला पुरुषाने मानाचे स्थान दिले तरच ते शक्य आहे व काही विकृत पुरुषांचा नाश करणे हेही महत्वाचे ठरेलं. तेव्हाच स्त्री पुरुष भेदभाव नष्ट करून समानता झाली असे म्हणता येईल. जागतिक महिला दिनानिमित्य प्रत्येक माझ्या आई बहिणींना हार्दिक हार्दिक शुभेच्छा!!
संकलन :-शेषराव गो. कडू
मो. नं. 9923988734वरुड