spot_img

*ग्रामविकासाचे अभिनव धुलिवंदन* *प्रवीण देशमुख यांनी लावलेले रोपटे आता गावागावात पोहचले.

वर्धा : वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांचा ग्रामगीतेचा ग्रामशुद्धी अध्याय रंगपंचमीचे महत्त्व विशद करतो हाच संदेश पुढे घेऊन २८ वर्षांपूर्वी गावातील लहान मुलांना सोबत घेऊन संत विचाराचे विविध रंगांचे सर्व समाजाला एकत्रित करून सुरगाव येथे सुरुवात करून आज हाच उपक्रम श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या माध्यमातून विविध गावात होत आहेत. वंदनीय राष्ट्रसंत यांच्या ग्रामगीतेमध्ये म्हणतात होळीचा आला शिमगा सण, त्यात मोठी मारहाण हाच विचार घेऊन श्री गुरुदेव सेवा मंडळाचे श्री.प्रवीणभाऊ देशमुख यांनी अभिनव धुलीवंदन सोहळा सुरू केला. वंदनीय राष्ट्रसंत, संत गाडगेबाबा यांचे विचार व सर्व समाजाचा सहभाग घेऊन कामाला सुरुवात केली आज हाच उत्सव काळाची गरज झालेली आहेत. गीताचार्य तुकाराम दादा, ग्रामगीताचार्य रामकृष्ण बेलुरकर दादा, सप्त खंजिरी वादक सत्यपाल महाराज, इंजिनीयर भाऊसाहेब थुटे साहेब श्री बा.या.वागदरकर , श्री सुरेश पंत मांडाळे श्री. बा. दे. हांडे श्री मोहनबाबू अग्रवाल ,श्री मोहनभाऊ गुजरकर व विविध प्रबोधन करणारी मंडळी, होळीच्या दिवसांमध्ये गावामध्ये बोलवून, ग्राम विकासाची होळी, रंग मुक्त होळी, गावाला चालना देणारी होळी, वर्षभर विविध गावांमध्ये प्रबोधन करून, त्यामधून जमा झालेला पैसा, गावातील गरीब लोकांना कपडे घेऊन, शालेय मुलांना मदत करून रंग महोत्सव सुरू झाला, आज होळीच्या तीन दिवसांमध्ये, मुलांसाठी विविध स्पर्धा, गावात आरोग्य शिबिर, गावात शेती शाळेचे प्रशिक्षण, सेंद्रिय शेतीचे प्रशिक्षण, प्रबोधन किर्तन, शेतकरी व ग्राहक मेळावा, सामान्य ज्ञान स्पर्धा, विविध चर्चासत्र, सर्व समभाव, सर्वधर्म प्रार्थना, रंगपंचमीच्या दिवशी गावातून प्रबोधन दिंडी, चौका चौकात संत महापुरुषांचा गजर, नवविचाराचा उदघोष, झाडाची कत्तल थांबविणे, रंग न खेळणे, अंधश्रद्धेतून लोकांना बाहेर काढणे, वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज, वैराग्यमूर्ती गाडगेबाबा, त्यांचे रचनात्मक कार्य, प्रवीण भाऊ देशमुख यांनी राबवणे सुरू केले, आज हाच संदेश, वर्धा जिल्ह्याच्या व्यतिरिक्त इतर गावांमध्ये सुरू झालेला आहे. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा खरा रचनात्मक विचार सामान्य पर्यंत पोहोचविणे,वाईट प्रथेची होळी करणे, व ग्राम विकासाला विशेष म्हणजे या कार्यक्रमासाठी गावातून कोणतीही वर्गणी गोळा केला जात नाही .ज्यांना द्यायचे असेल ते स्वखुशीने या अभिनव कार्यक्रमाला मदत करतात आणि तीन दिवसानंतर गावकऱ्यांच्या समोर या कार्यक्रमाचा सर्व हिशोब संपन्न होतो, वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची सामुदायिक प्रार्थना, सामुदायिक ध्यान, गावात प्रभात फेरी,, ग्रामगीता प्रबोधन, या उपक्रमातून हा होळीचा उत्सव संपन्न होतो.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या