spot_img

*जिद्द…

“जगण्याची जिद्द, असण्याची जिद्द,
स्वप्नांना गाठण्याची जिद्द…
वाऱ्याच्या विरुद्ध उभं राहण्याची,
आणि सागरासारखं खोल जाण्याची जिद्द…

तुफान येवो अथवा अंधार दाटो,
मनातली आशा कधी ना माटो…
पाऊलवाट शोधत निघायचंय,
नशिबालाही झुकवायचंय…

हार-जीत हा केवळ खेळ इथला,
हृदयात पेटवूया दीप नवा…
म्हणूनच हवी ती जिद्द,
फक्त जगण्याचीच नव्हे, तर…
“कविराज” असण्याचीही जिद्द!”

*कवी महंत राज शास्त्री… ✍️*
*एम. ए. साहित्याचार्य, वास्तु विशारद*
*नागपूर, ८३९०३४५५००*

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या