बाबा,डॅडी, पप्पा,दाआजी, अण्णा बोलायला, ऐकायला किती छान वाटतंय ना!
पण आपण कधी कधी मुद्दामहूंन, जाणून-बुजून त्यांना बाप या नावाने संबोधततो. आज अशाच एका बापाची कहाणी.. आई घराचे मांगल्ये असते,तर वडील घराचे अस्तित्व असतात,पण या अस्तित्वाला कधी समजून घेतले आहे. त्यांच्या विषयी अजून तरी फारशे चांगले बोलले जात आहे… नाही.
लोकांनी वडील रेखाटलेले आहेत ते ही तापट,व्यसनी, चिडखोर,भांडखोर मारझोड करणारे,नाही असे वडील असतीलही 1ते 2 टक्के पण बाकीच्या चांगल्या वडिलांचेबद्दल काय? आईकडे अश्रूची पाठ असतात ती रडून मोकळी होते, पण सांत्वन वडिलांनाच करावे लागते, आणि रडणाऱ्या पेक्षा सांत्वन करणाऱ्यावर जास्त ताण पडत असतो कारण ज्योती पेक्षा समईच जास्त तापत असते, आणि श्रेय!!श्रेय मात्र ज्योती घेऊन जाते. रोजच्या जेवणाची सोय करणारी आई आपल्या लक्षात राहते, पण आयुष्याच्या शिदोरीची सोय करणारा बाप आपण किती सहज विसरून जातो. आई-सर्वासमोर मोकळेपणाने रडून दुःख व्यक्त करते पण रात्री उशीत तोंड खूपसून मुसमुसतात ते आपले वडीलच असतात, स्वतःचे वडील जरी वारले तरी त्यांना रडता येत नाही, कारण लहान भावंडाना धीर देणे, कुटुंबाला आधार देणारे तेच असतात,पत्नीने अर्थवासात सोडले तरी स्वतःला आवर घालत मुलांच्या अश्रूंना आवर घालणारे वडीलच असतात. जिजाऊंनी शिवबांना घडविले असे अवश्य म्हणता येईल, पण त्याच वेळी शहाजीराजांची ओढाताण लक्षात घ्यावी,देवकी यशोदेचे कौतुक अवश्य करावे पण त्याच वेळी भर पुरात डोक्यावरून पुत्राला घेऊन जाणारा वासुदेव आठवावा, राम हा कौशल्या पुत्र अवश्य आहे पण पुत्र वियोगाने तडफडून मरणारा बाप राजा दशरथच होता. वडिलांच्या टाचा झिजलेली चप्पल आणि फाटलेले बनियान पाहिले की कळते की नशिबाची भोक त्यांच्याबनियनला पडलीआहेत. त्यांचा दाढी वाढलेला चेहरा त्यांची काटकसर दाखवतो, मुलांना कपडे घेतील, बायकोला साडी घेतील, पण स्वतः मात्र जुनीच कपडे वापरतील. मुलगा सलून मध्ये पन्नास एक रुपये खर्चतो,मुलगी पार्लरमध्ये शंभर एक रुपये खर्चेल,पण त्याच घरातील बाप मात्र दाढीचा साबण संपला तर आंघोळीच्या साबणाने दाढी करतील, कधीकधी तोही नसेल तर पाणी लावून दाढी रखडतील. बाबा कधी आजारी पडले तर कधी डॉक्टर कडे जात नाही.मुळात ते आजारपणाला घाबरतच नसतात, त्यांना काळजी असते ती डॉक्टरांनी महिनाभरासाठी आराम करायला लावण्याची, कारण मुलीचे लग्न, मुलाचे शिक्षण, घरातील सर्व खर्च याची काळजी असते.कारण घरात उत्पन्नाची साधन ही फक्त तेच असतात. ऐपत नसली तरी सर्व खर्चात काटकसर करून मुलांना मेडिकल, इंजिनिअरिंग, यासारख्या महागड्या शिक्षणाचा खर्च सोसतात, महिन्याचा पगार झाला की सर्व खर्चात बचत करून, काटकसर करून पहिले मुलाला त्याच्या शिक्षणासाठी पैसे पाठवतात तर सर्वच मुले नसले तरी बरीच मुले या पैशाच्या पैशातून आणि मौज मजा जास्त करतात.मित्रांना पार्टी देणे,सिनेमे पाहने, या सगळ्यात आपल्याला पैसे पाठवणाऱ्या वडिलांची टिंगल टवाळी करत असतात. हीच मुले एकमेकांना वडिलांच्या नावाने हाक मारणे, त्यांच्या स्वभावाची टर उडवणे असले प्रकार चालू असतात.ज्या घरात वडील आहेत त्या घराकडे कोणाची वाकडी नजर करून पाहण्याची हिंमत होत नाही. कारण त्या घरातला कर्ता जिवंत असतो. तो जरी काही करत नसला तरी तो त्या पदावर असतो,आई असण्याला आणि अथवा आई होण्याला वडिलांमुळे अर्थ प्राप्त होतो. कोणत्याही परीक्षेचा निकाल लागला की जवळी वाटते ती आई, कारण ती जवळ घेते,कौतुक करते, प्रेम करते, गोंजाळते, पण गुपचूप जाऊन पेढे आणणारा, अभिमानाने सर्वांना सांगणारा बाप कोणालाच दिसत नाही.चटका बसला ठेच लागली फटका बसला, ठेचं लागली,तर तोंडातून आपसुकच आई हाच शब्द बाहेर पडतो,पणएखादा मोठा रस्ता ओलांडताना अचानक जर एखाद्या ट्रकने जोरात ब्रेक मारून मोठे संकट टाळले तर त्यावेळी आपण बापरे….! असेच म्हणतो, छोटी छोटी संकटे आई सोसती हो, पण मोठी मोठी वादळे पेलताना बापच आठवतो,…काय पटतंय काय??? एखाद्या मंगल प्रसंगी अखंड कुटुंब सहभागी होत असते, पण जर एखादा मयत झाला तर बापाला जावेच लागते.मुलांच्या नोकरीसाठी साहेबांपुढे लाचार होणारा बाप, मुलीच्या स्थळासाठी उंबरठे झीजवणारा बाप,घरच्यांसाठी स्वतःच्या व्यथा दडपणारा बाप, खरच किती ग्रेट असतो बाप. वडिलांचे खरे महत्त्व त्यांनाच कळते ज्यांचे वडील लहानपणी जातात आणि घरांच्या सर्व जबाबदाऱ्या पेलाव्या लागतात. एकेक गोष्टीसाठी त्यांना तरसावं लागतं तेच वडिलांचे महत्व समजतात. वडिलांना समजून घेणारी एकमेव व्यक्ती असते ती म्हणजे त्यांची मुलगी, सासरी गेल्यावरही अथवा घरापासून दूर असतानाही फक्त फोनवर बोलताना वडिलांचा आवाज जरी बदललेला असला तरी त्यावरून 17 प्रश्न विचारेल, त्यांची विचारपूस करेल वडिलांना खऱ्या अर्थाने ओळखतो ती त्याची मुलगीच असते. वडिलांना जपणारी, त्यांची काळजी करणारी ही मुलगीच असते आणि एवढीच अपेक्षा एक वडील सर्वांपासून करत असतो.आजही कठीण परिस्थितीत/ प्रश्न सामोरे आले असता, मन एक विचार असेही करते की या परिस्थितीत/ प्रश्न वडील कसे सामोरे गेले असते?आपण कसे जातोय? काय चुकतय काय आपलं? परिस्थिती अत्यंत्यिक विरोधी व क्रूर असेल तर तिच्याशी तिच्याही पेक्षा जास्त गक्रूर होऊन तिला सामोरे जाण्यासाठी लागणारे खंबीर मन मला तरी माझ्या वडिलांकडूनच त्यांच्या उदाहरणातूनच मिळाले आहे. धावत जावं बाबांना मिठी मारावी पण या जन्मी शक्य नाही वडिलांना समजून घेणारी एकमेव व्यक्ती असते ती म्हणजे त्यांची मुलगीच असते. काळजी करणारी ही मुलगीच असते आईचं गुणगान खूप झाले, पण बिचाऱ्या बापाने काय केले. बिकट प्रसंगी बापच सदा सोडवी, आपण फक्त गातो आईचीच गोडवी,आईकडे असतील अश्रूची पाट. तर बाप म्हणजे संयमाचा घाट, आठवते जेवण करणारी प्रेमळ आई, त्या शिदोरीची सोयही बापच पाहि, देवकी- यशोदेच प्रेम मनात साठवा, टोपलीतुन बाळात नेणारा वासुदेवही आठवा,रामासाठी कौशल्यची झाली असेल कसरत, पुत्र वियोगाने मरण पावला बाप दशरथ, काटकसर करून मुलास देतो पॉकेटमनी, आपण मात्र वापरी शर्ट -पॅन्ट जुनी. मुलीला हवे ब्युटी पार्लर, नवी साडी, घरी बाप आटपतो ह बिन साबणाची दाढी, वयात आल्यावर मुले आपल्याच विश्वात मग्न, बापाला दिसे मुलाचे शिक्षण, पोरीचे लग्न, मुलाच्या नोकरीसाठी जिना चढून लागतेत धाप, आठवा मुलीच्या स्थळासाठी उंबरठे झिजवणारा बाप. जीवनभर मुलांच्या पाठी बापाच्या सदिच्छा त्यांनी समजून घ्यावं हीच माफक इच्छा!! पिता की मौजुदगी, सुरज की तरह होती है, सुरज गर्म जरूर होता है, लेकिन अगर न हो तो अंधेरा छा जाता है!!वडील म्हणजे कुटुंबातील मुला मुलींचा बालकाचा जन्मदाता पुरुष ज्याला आई प्रमाणेच कुटुंबात विशेष स्थान असते. पालक म्हणजे आई वडील तुमची आई आणि तुमचे वडील हे तुमचे पालक आहेत आणि त्यांचे एक काम म्हणजे तुमचे पालन पोषण करणे आपण सर्वजण पालकांच्या पोटी जन्माला आलो आहोत आणि जे आपले पालन पोषण करतात वडील नेहमीच आपल्या मुलांना आधार देण्यासाठी आणि मार्गदर्शन करण्यासाठी असतात जर ते पडले तर त्यांना पाठिंबा देण्यासाठी त्यांच्या जवळच राहतात. वडील म्हणजे खूप काही असतील परंतु मूलत हा तो एक प्रेमळ पालक असतो जो आपल्या मुलांसाठी निर्भयपणे टोकाचा प्रयत्न करतो. सहभागी आणि गुंतलेले वडील त्यांच्या मुलांच्या मानसिक आरोग्यावर लक्षणीय संरक्षणात्मक आणि सकारात्मक परिणाम देतात. मानसिक आजार रोखणे आणि मदत मागण्या बद्दल अधिक सकारात्मक दृष्टिकोन समाविष्ट आहे. वडील असणे हे एक आशीर्वाद आहे. वडील असणे तुम्हाला सुरक्षितेची भावना देते. की जर तुमच्या आयुष्यात काही चूक झाली असेल तर एक शक्तिशाली व्यक्ती आहे जो तुमची समस्या सोडू शकतो.वडील असणे आरामदायी असते जोपर्यंत तुम्ही त्याच्या आधीन नाही तोपर्यंत तुम्हाला तुमच्या कोणत्याही गरजाबद्दल काळजी करण्याची गरज नाही. त्यांचे प्रेम त्याग करणारे,सहनशीलता, दयाळू, नम्र, प्रामाणिक, क्षमाशील, विश्वासू आणि निस्वार्थ आहे.ते सतत आणि अपरिवर्तनीय आहे. या अशा गोष्टी आहेत ज्याबद्दल मी माझे जीवन केवळ असावे असेच इच्छित नाही तर माझ्या मुलांनाही माझ्याबद्दल जाणून घ्यावी आणि त्यांना ते जाणवावे अशी माझी इच्छा आहे. दुर्दैवाने मी देवासारखा परिपूर्ण नाही. ज्यामध्ये माझे पितृत्व समाविष्ट आहे.तो नेहमीच मोठे चित्र पाहतो स्वर्गीय पिता आपल्यावर निसर्ग प्रेम करतो त्यांच्यासोबत कोणतेही उतार चढाव किंवा कोणत्याही प्रमाणात स्वार्थ नाही आपण चांगले असो व वाईट तो आपल्यावरही तसेच प्रेम करतो आणि आपण अशी काहीही करू शकत नाही की तो आपल्यावर जास्त किंवा कमी प्रेम करेल पित्याचे आपल्यावरील प्रेम त्यांच्या एकुलत्या एका पुत्राला मुक्तपणे अविचारीपणे आणि अयोग्यपणे पाठवण्यापेक्षा स्पष्ट आणि अधिक आकर्षक कुठेही नाही.जगात स्वतःपेक्षा जास्त आपल्यावर प्रेम करणारा माणूस म्हणजे बाबा मला हे जे तर दाखवले आणि त्याही पलीकडे या जगात जगताना माणसाने माणसाशी कसे वागावे याची शिकवण देणारा एक खूप चांगला माणूस म्हणजे माझे वडील माझ्यासाठी किंग फक्त माझे वडील आणि माझी सुपर हिरो सुद्धा. माझा गुरु व आई कल्पतरू असेल तर बाबा माझे गुरुकुल व बाबा माझे कल्पतरूंची उद्यान आहे. हाही आपल्या बाळाला कडेवर घेते कारण तिची इच्छा असते मला आपला बाळाला पण दिसावे, परंतु एक बाप आपल्या मुलांना खांद्यावर घेतो कारण त्यांचे स्वप्न असते की जे मी मिळू शकलो नाही पाहू शकलो नाही त्यापेक्षा प्रत्येक पटीने जास्त माझ्या मुलाने मिळवावे. त्याने ते पहावे त्यांच्या रागवण्यातही प्रेम काळजी आणि कर्तव्यदक्षता दडलेली असते. हे ज्याला समजले त्याला खरे आयुष्य समजले….पण अगदी शेवटी प्रत्येकच मुलगा म्हणतो माझ्यासाठी बाबांनी काय केलं? तुम्ही स्वतःला विचारा बापाने काय केलं. लहानपनापासून तुला जोपसले, जग दाखवले, जगवले, शिक्षण दिले प्राथमिक ज्ञानहीं दिले. रक्ताचे पाणी करून रात्र दिवस कष्ट करून कुटुंब सांभाळेल पण अरे रे… किती दुःखद माझ्यासाठी काय केले. ईश्वरिय अवतार असलेले आई वडिलांना हे शब्द किती वेदनादायक वाटतं असतील. या लिखाणातून जरूर काहीतरी घ्यावं.. जय माय बाप..!!!
संकलन :-शेषराव गो. कडू
वरुड मो नं. 9923988734