आज 27 मार्च जागतिक रंगभूमी दिवस, आज आपण केलेल्या कामाचा सत्कार, केलेल्या कार्याची ओळख. मंचावर सर्व विसरून दुःखाचा डोंगर जरी असला मागे तरी समाजाला त्याची कुणकुण न लागता केलेला रोल म्हणजे रंगभूमी. समाजामध्ये कशाची उणीव आहे, निसर्गाला काय आवश्यक आहे. पण आज आपण त्या विरोधी कशे चाललो याच चित्रण करणे, समाजाला समाजपयोगी बाबीचे सहजासहजी मन न दुखवता मंचावर दाखवणे त्यांचा प्रत्येकाच्या मेंदूवर परिणाम करून परिवर्तन हे कार्य महत्वाचे आहे. आज रंगभूमीवर अनेक बाबी दाखवणे आवश्यक आहे. मनोरंजन व्यतिरिक्त, सामाजिक घडामोडी, आवश्यक असलेले बदल थियेटर मध्ये विश्लेषण करून सामाजिक परिवर्तन आज पावेतो घडत आहे.27मार्च जागतिक दिन म्हणून साजरा करण्यात येतो.व्यक्ती आणी त्यातील संवाद साधण्याची कला यातून सामुदाईक अविष्कारला रंगभूमी म्हटले जाते.नात्यासंहिता, नाट्यदिग्दर्शक, रंगभूषा, वेशभूषा, रंगमंदिर, रंगमंच या सर्व गोष्टी रंगभूमीशी जोडल्या जातात.या दिवसाचे सार कला प्रकाराला प्रोत्साहन देणे आणी सरकार, व्यक्ती, संघटनाचा नाट्य समुदयाला पाठींबा देण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी प्रेरित करणे हे या दिवशी लोक अनेक कार्यक्रम सादरीकरण, व्याख्याने, नाट्य समुदाय कार्यक्रम पुरस्कार समारंभ लाईव्ह सादरीकरण करणे आयोजित करून वेगळा उत्साह दर्शवीला जातो.
रंगभूमीवर रंग देणे साधे आणी सोपे निश्चितच नाही.कुटूंबातील दुःख विसरून लोकांना खूष करण्यात क्रितेकांचं जीवन वाहिले, पण त्यांचे त्यांनाच कळले नाही. प्रेक्षकांचे मनोरंजन केले स्वतः पण दुःख जोपासले अनेकांचे जीवन वेदनादाई झाले. पण रंगमांच्यावर त्यांचा तिळमात्र फरक पडू दिला नाही.आजही रंमंचावर भूमिका बजावणे वाटते तेवढे सोपे नाही. काही प्रेक्षक चेष्टा सुद्धा करतात. तेही सहन करता करता टाळ्या सुद्धा भेटतात. पण रंग्माचावरील भूमिका निभावतांना प्रेक्षकांना ज्यांनी सहन केले, जे जनतेला पाहिजेत ते जर भूमिकेतून दिले तर नटसम्राटव्हायला वेळही लागणार नाही. व असे घडले ते खरच धन्य आहेत. रंगभूमी वर भूमिका सादर करणाऱ्या प्रत्येकास मनापासून शुभेच्छा…
संकलन :-शेषराव कडू
वरुड