आष्टी (शहीद) ग्रामीण भागातील विद्यार्थी व युवक ,युवती व महिला व पुरुष मंडळी यांना सुप्रसिद्ध असा छावा चित्रपट आपल्या गावातील व परिसरातील प्रत्येक नागरिकांना पाहता यावा. हा उद्देश ठेवून तालुक्यातील खडकी येथे श्री.शंभूशेष बाबा देवस्थान समोर श्रीरामनवमी निमित्त राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार ) गटाचे प्रदेश सचिव व सुप्रसिध्द वक्ते शुभम उद्धवराव नागपुरे यांचे वतीने दिनांक ८ एप्रिल रोज मंगळवार रात्री ७ वाजता शौर्य ,बलिदान,अभिमानाचा व मराठ्यांच्या मराठमोळ्या आत्म्याच्या अखंड साक्ष असणारा छावा या चित्रपटाचे थेट प्रक्षेपण दाखविण्यात येणार आहे. तरी खडकी पंचक्रोशीतील सर्व युवक,युवती ,विद्यार्थी ,महिला व पुरुष मंडळी यांनी आपल्या कुटुंबासह छावा हा चित्रपट पाहण्याकरिता उपस्थित राहावे. असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते शुभम उद्धवराव नागपुरे यांनी केले आहे.