spot_img

*ग्राम विकास कार्यात सहभाग घेणारे सेवक श्री.खुशालराव येडे यांच्या निधनाने हळहळ* *कबड्डी खेळात प्रावीण्य प्राप्त! वृध्दापकाळाने मृत्यु.*

वर्धा :पांढरकवडा,गणेशपुर या छोट्याश्या गावात सेवाग्राम दवाखान्याच्या सामुदायिक वैद्यक विभागाच्या विविध प्रकल्पाच्या माध्यमातून गाव विकासात्मक कार्यात तळमळीने प्रयत्न करणारे श्री खुशाल दामोधरराव येडे यांचे वयाच्या ७६ व्या वर्षी वुध्दापकाळाने सेवाग्राम रुग्णालयात दिनांक १०•४•२०२५ ला सकाळी ७ वाजता निधन झाले.गणेशपुर ,पाढंरकवडा या परीसरात कबड्डी खेळाच्या माध्यमातून युवकांना कबड्डीचे प्रशिक्षण देऊन गावागावात कबड्डी खेळाला त्यांनी प्रोत्साहन दिले,गणेशपुर येथे ‘किरण क्लिनिक ‘ दवाखान्याच्या माध्यमातून आरोग्य सेवेचे कार्य करणारे श्री खुशालराव येडे काम पाहत होते. गावात ग्राम विकास कार्यात,किल्सक प्रकल्पाच्या माध्यमातून सेवाग्राम चे डॉ. बी.एस.गर्ग सर यांच्या पुढाकाराने त्यांनी प्रयत्न केले.महीलांचा विकास, बालविकास, सहजीवन चैतन्य नात्याचे या प्रकल्पा च्या माध्यमातून त्यांनी जेष्ठ नागरिकांचे संघटन करुन त्यांचे सहजीवनासाठी सामुदायिक वैद्यक विभाग सेवाग्रामचे गाव कार्यात सहभाग घेऊन कार्य करीत होते. ते विविध उपक्रमाचे मास्टर्स ट्रेनर म्हणून काम पाहत होते. त्यांच्या निधनाने ग्रामविकासाच्या कार्यात प्रोत्साहन देणाऱ्या सामाजिक कार्यकर्ता आपल्याला कायमचा सोडून गेल्याने गणेशपुर ,पांढरकवडा गावात हळहळ व्यक्त होत आहेत.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या