अज्ञानाने भीती जन्म घेते, भीतीने अंधविश्वास जन्म घेते,अंधविश्वासाने अंधश्रद्धा जन्म घेते, अंधश्रद्धेने माणसाचा विवेक शून्य होतो, माणसाचा विवेक शून्य झाला की माणूस मानसिक गुलाब बनतो!”शिका संघटित व्हा संघर्ष करा” या देशाचे भविष्य विध्यार्थ्यावर अवलंबून आहे. विध्यार्थी आपल्या समाजातील बुद्धिमान वर्ग आहे आणि म्हणूनच जनमत घडवण्याची क्षमता त्यांच्यात आहे. स्वतःच्या स्वार्थ आणि स्वतःच्या अस्तित्वासाठी वळवळ करणे म्हणजे चळवळ नव्हे,महामानवांची विचारधारा गाव खेड्यातील शोषित, दुर्लक्षित, जनसामान्यात रुजवून समाज परिवर्तन घडवून आणणे म्हणजे चळवळ होय. एका सामान्य कुटुंबात जन्मलेले आंबेडकर हे एका लष्करी अधिकाऱ्याचे पुत्र होते. लहानपणीस त्यांना त्यांच्या उच्च जातीच्या शाळेतील सहकाऱ्यांनी अपमानित केले.बडोद्याच्या गायकवाड कडून शिष्यवृत्ती मिळाल्यानंतर त्यांनी अमेरिका, ग्रेट ब्रिटन आणि जर्मनीमधील विद्यापीठांमध्ये शिक्षण घेतले.या काळात ते वकील म्हणून पात्र ठरले.गायकवाडच्या विनंतीवरून त्यांनी बडोदा पब्लिक सर्विसमध्ये प्रवेश केला. परंतु पुन्हा त्यांच्या उच्च जातीच्या सहकार्याकडून त्यांना वाईट वागणूक मिळाल्याने हे वकीली आणि अध्यापनाकडे वळले. बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे जनक होते. आंबेडकरांनी दलितांमध्ये आपले नेतृत्व स्थापित केले. त्यांच्या वतीने अनेक नियतकालिकांची स्थापना केली. आणी हिंदू जातीव्यवस्थेने स्थापित केलेल्या सामाजिक प्रतिबंधाविरुद्ध निदर्शने केली. अशाच एका प्रसंगी 1927 मध्ये महाराष्ट्रातील महाड शहरातील एका तलावातील पाणी पिण्यावरील दलितावर बंदी घालण्यासाठी सत्याग्रह ते एका भाषणात म्हणाले, अस्पृश्यता ही साधी गोष्ट नाही ती आपल्या सर्व गरिबी आणि निचतेची जननी आहे आणि तिने आपल्याला आज दयनीय स्थितीत आणले आहे. जर आपल्याला त्यातून बाहेर पडायचे असेल तर आपण हे काम (अस्पृश्यता निर्मूलन )हाती घेतले पाहिजे. इतर कोणत्याही मार्गाने आपल्याला वाचवता येणार नाही. हे काम केवळ आपल्या फायद्याचे नाही तर, ते राष्ट्रांच्या फायद्याचे देखील आहे. सार्वजनिक जीवनात दलितांची संख्या वाढावी यासाठी आंबेडकरांनी आंदोलन केले आणि सरकारच्या कायद्याने मंडळामध्ये विशेष प्रतिनिधित्व मिळवून देण्यातयश मिळविले. हिंदू समाजाच्या उपेक्षित घटकांच्या दर्जात सुधारणा करण्याच्या त्यांच्या प्रयत्नादरम्यान, सामाजिक समतेसाठी दोघांचीही समान वचनबद्धता असूनही त्यांचा महात्मा गांधीजी संघर्ष झाला. अगस्ट 1932 मध्ये असलेल्या गांधींनी दलित समुदायासाठी स्वतंत्र मतदारसंघाच्या वाटपाच्या निषेधार्थ आमरण उपोषण केले. कारण त्यांना वाटले की यामुळे हिंदू एकता कमी होईल आणि भारतीय स्वातंत्र्य चळवळीवर नकारात्मक परिणाम होईल. दलितांसाठी स्वतंत्र मतदार संघाचे समर्थन करणारे आंबेडकर गांधीचे जीवन वाचवण्यासाठी तडजोड करण्यास सहमत झाले.परिणामी सप्टेंबर 1932 मध्ये पुणे करारावर साक्षरी झाली. ज्यामध्ये हिंदू मतदार क्षेत्रात दलितांसाठी राखीव जागा उपलब्ध होत्या. 1936 मध्ये आंबेडकरांनी स्वतंत्र कामगार पक्षाची स्थापना केली आणि गांधी आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे ते कटू टीकाकार राहिले.दलितांसाठी बोलण्याच्या गांधीच्या दाव्याला आव्हान देत, आंबेडकरांनी काँग्रेस अँड गांधी यांनी अस्पृश्य अस्पृश्यासाठी काय केले.1945 साली लिहिले.मी हिंदू म्हणून मरणार नाही,आंबेडकर हिंदू धर्म आणि जातीच्या पदांनुक्रमांत ब्राह्मणांच्या वर्चस्वावर टीका करत होते. 1935 मध्ये महाराष्ट्रातील येवला येथे एका सभेला संबोधित करताना त्यांनी घोषित केले.मी हिंदू धर्मात जन्मलो पण मी हिंदू म्हणून मरणार नाही. दोन दशकानंतर ऑक्टोबर 1956 मध्ये त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला. आंबेडकरांना 1990 मध्ये सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न, प्रदान करण्यात आला. त्यांचा वाढदिवस 14 एप्रिल हा अनेक भारतीय राज्यांमध्ये सुट्टी म्हणून साजरा केला जातो. सहा डिसेंबर रोजी त्यांची पुण्यतिथी देशभरात महापरिनिर्वाण दिवस म्हणून साजरी केली जाते. त्यांचे वडील सुभेदार होते ते संत कबीरांचे अनुयायी होते आणि सुशिक्षित होते. डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर दोन वर्षाचे असताना वडील सेवानिवृत्त झाले ते जेमतेम सहा वर्षाच्या असताना आईचे निधन झाले. बाबासाहेबांचे प्राथमिक शिक्षण मुंबईत झाले भारतात अस्पृश्य असणे काय असते याचा धक्कादायक अनुभव त्यांना शालेय जीवनात आला. डॉक्टर आंबेडकरांनी हेल्पिंग स्टार कॉलेज बॉम्बे येथे पदवीचे शिक्षण पूर्ण केले त्यासाठी त्यांना बडोदा संस्थांचे सयाजीराव गायकवाड यांच्याकडून शिष्यवृत्ती मिळत होती. 1913 या वर्षात डॉक्टर आंबेडकरांनी उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला जाण्यासाठी विद्वान म्हणून निवड झाली.हा त्यांचा शैक्षणिक कारकीर्दीचा टप्पा होता कोलंबिया विद्यापीठातून 1915 आणि 16 मध्ये एम. ए. आणि पीएचडी पदवी प्राप्त केली. पुढील शिक्षणासाठी ते लंडनला गेले मध्ये प्रवेश देण्यात आला. आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्स बीएससी तयारी करण्याची सही परवानगी देण्यात आली. बडोद्याच्या दिवानांनी त्यांना भारतात परत बोलावणे त्यांनी बार हक्क आणि बीएससी पदवी देखील मिळवली त्यांनी जर्मनीतील भवन विद्यापीठातही भारतातील जाती त्यांची व्यवस्था उत्पत्ती आणि विकास हा शोध निबंध त्यांनी वाचला 1916 मध्ये त्यांनी भारताचा राष्ट्रीय लाभांश एक ऐतिहासिक आणि विश्लेषणात्मक अभ्यास हा प्रबंध लिहिला आणि पीएचडी ही पदवी मिळवली. भारतातील प्रांतीय अर्थव्यवस्थेची उत्क्रांती या शीर्षकाखाली आठ वर्षानंतर हा प्रबंध प्रकाशित झाला.सर्वोच्च पदवी प्राप्त केल्यानंतर परतले आणि पुढील काळात अर्थमंत्री बनण्यासाठी तयार करण्याच्या दृष्टीने बडोद्याच्या महाराजांचे लष्करी सचिव म्हणून त्यांना नियुक्त करण्यात आले.स्वातंत्र्यानंतर 1947 मध्ये नेहरूंच्या पहिल्या मंत्रिमंडळात कायदा आणि न्याय मंत्री म्हणून नियुक्ती झाली. 1951 मध्ये त्यांनी काश्मीर प्रश्न, भारताचे परराष्ट्रीय धोरण हिंदू कोड बिल याबाबत नेहरूंच्या धोरणावरून मतभेद व्यक्त करत आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला. आताच्या राज्यघटनेचा मसुदा तयार करण्यास मधील त्यांचा योगदानाचा गौरव म्हणून 1952 ते कोलंबिया विद्यापीठाने त्यांना 1953 रोजी उस्मानिया विद्यापीठाने त्यांना डायरेक्ट डॉक्टर ही पदवी प्रदान केली. 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपूर इथल्या ऐतिहासिक समारंभात त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला आणि नंबर 1956 रोजी त्यांचे निधन झाले. 1954 मध्ये नेपाळमध्ये काठमांडू येथे झालेल्या जागतिक बौद्ध धर्म परिषदेत बहुतेक्षणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मोदी सत्व ही पदवी प्रदान केली ते हयात असताना त्यांना बोधीसत्व ही पदवी प्राप्त झाली. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात आणि स्वातंत्र्यानंतरच्या सुधारणांमध्ये त्यांनी योगदान दिले. याशिवाय रिझर्व बॅंक ऑफ इंडियाच्या स्थापनेतही बाबासाहेबांचीं मोलाची भूमिका बजावली. बाबासाहेबांनी हिल्टन यंग कमिशन समोर मांडलेल्या संकल्पनेवर मध्यवर्ती बँकेची स्थापना झाली होती. हा दिमागदार जीवन प्रवास त्यांच्या अभ्यासू आणि कृतिशील व्यक्तिमत्त्वाचे दर्शन घडवतो.सर्वात प्रथम त्यांनी अर्थशास्त्र राजकारण कायदा तत्त्वज्ञान आणि समाजशास्त्र या विषयाचे उत्तम ज्ञान संपादन केले. शिक्षण घेताना त्यांना अनेक सामाजिक समस्यांना तोंड द्यावे लागले.पण त्यांनी आपले आयुष्य केवळ वाचन अभ्यास आणि ग्रंथालयात व्यस्त त्यांनी आकर्षक पगाराची उच्च पदे नाकारली.कारण ते शोषित वर्गातील आपल्या बंधूंना विसरले नाही त्यांनी आपले उर्वरित आयुष्य समता बंधुता आणि मानवतेसाठी समर्थ ित पिचलेल्या वर्गाच्या उन्नतीसाठी त्यांनी सर्वतोपरी प्रयत्न केले त्यांचा जीवन इतिहास पाहिल्यावर त्यांचे मुख्य योगदान आणि त्यांची प्रासंगिकता अभ्यासणे आणि त्यांचे विश्लेषण करणे आवश्यक आणि योग्य आहे. मतप्रवाहनुसार तीन मुद्दे आजही अधिक महत्त्वाचे आहे भारतीय अर्थव्यवस्था आणि भारतीय समाज आजही अनेक आर्थिक सामाजिक समस्यांना तोंड देत आहे.या समस्या सोडवण्यामध्ये आंबेडकरांचे विचार आणि कृती मार्गदर्शक ठरल्यास ते भारतीय न्याय शास्त्रज्ञ अर्थशास्त्रज्ञ रासकांनी तत्त्वज्ञ आणि समाज सुधारक होते त्यांनी दलित बौद्ध चळवळीला प्रेरणा दिली आणि अस्पृश्य लोकांविरुद्ध नष्ट करण्यासाठी चळवळ उभारली तसेच महिलांच्या आणि कामगारांच्या हक्काचे समर्थन केले ते संविधान सभेचे हे प्रमुख सदस्य होते म्हणून त्यांना भारतीय संविधानाचे जनक म्हणून ओळखले जाते.बाबासाहेबांचे दिलेल्या विचारांचे अवलोकन कराच. स्वतःवर विस्वास ठेवा, इतरांना समजून घ्या, इतिहास विसरू नका, हक्कासाठी संघर्ष करा, शिक्षण वाघिणीचे दूध आहे, मावळत्या चंद्राला विसरू नका, बुद्धिमत्तेचाविकास महत्वाचा, कर्मावर विश्वास ठेवा…. जात ही विटांची भिंत किंवा काटेरी तारांसारखी भौतिक वस्तू नाही. जी हिंदूंना एकत्र येण्यापासून रोखते आणी म्हणून ती खाली खेचली जाते. जात ही एक धारणा आहे, ती मनाची अवस्था आहे.
संकलन :-शेषराव गो. कडू
मो. नं. 9923988734(वरुड)