spot_img

*श्री साईबाबा लोक प्रबोधन कला, विज्ञान व तंत्रज्ञान महाविद्यालयामध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त कार्यक्रम*

वडनेर: श्री साईबाबा लोक प्रबोधन कला, विज्ञान व तंत्रज्ञान महाविद्यालय वडनेर येथे सांस्कृतिक विभागाद्वारे महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला. याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षा व महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सारिका चौधरी, कार्यक्रमाचे मार्गदर्शक डॉ. गणेश बहादे, डॉ. संजय दिवेकर, डॉ. विठ्ठल घिनमीने व कार्यक्रमाचे आयोजक डॉ. नितेश तेलहांडे मंचावर उपस्थित होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भारतीय संविधान या विषयावरती डॉ. गणेश बहादे यांनी सखोल मार्गदर्शन केले. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानांमध्ये जातिभेद, धर्मभेद व इतर समस्या याविषयी कायदे तयार केलेली आहे. त्यांनी समतेला प्राधान्य दिले. त्यांनी शिक्षणाला महत्व देऊन भारतातील सर्व नागरिकांनी शिक्षण घ्यावे असे त्यांना वाटत होते, विविध पुस्तकातुन आपले विचार त्यांनी समाजासमोर मांडले. अस्पृश्यता नष्ट झाली पाहिजे असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ध्येय होते, त्यासाठी संविधानामध्ये कायदे तयार केले. सर्व विद्यार्थ्यांनी संविधान वाचून कलमे, नियम समजून घेऊन जागृत व्हावे असे विचार डॉ. गणेश बहादे यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षा डॉ. सारिका चौधरी मॅडम अध्यक्षीय भाषण व्यक्त करताना म्हणाल्या की, सुरुवातीला त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य महान आहे, सर्वांनी त्यांचा आदर्श घेऊन आपले जीवन घडवावे. विशेष करून विद्यार्थ्यांनी त्यांनी लिहिलेले लिखित पुस्तके वाचावे व आपल्या शैक्षणिक जीवनामध्ये त्यांचा उपयोग करावा भारतीय संविधानाचे नियमितपणे वाचन करावे व नियमाचे, शिस्तचे पालन करावे, शिक्षणामध्ये समोर जायचे असेल तर विद्यार्थ्यांनी नियमित पुस्तके वाचायल हवी असे विचार त्यांनी मांडले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविकता डॉ. नितेश तेलहांडे व आभार डॉ. संजय दिवेकर यांनी व्यक्त केले. डॉ. प्रवीण कारंजकर, डॉ. विनोद मुडे, डॉ. नरेश भोयर, डॉ. पंकज मून व आरती देशमुख हे प्राध्यापक कार्यक्रमाला उपस्थित होते. शिक्षकेत्तर कर्मचारी व महाविद्यालयातील विद्यार्थी यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सहकार्य केले.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या