spot_img

_तिच्या पंखांना हवय आकाश !

ती गावातली,पण स्वप्न शहरातली
ती खूप शिकली,पण परिवारासाठी मागे हटली
ती करते दिवस रात्र कष्ट,
पण मतलबी समाजात सर्व नष्ट

स्वतः चे स्वप्न मारून बसली
मुलांचा जीवनाची कसोटी रचली
सांभाळते सर्व कामे आणि घर
तरी मनात पेरते नव्या जगाचा दर

तिचा दुःखाचा आवाज नाही
आणि तिचा वेदनांना सुद्धा भास नाही
तिचा स्वप्नाचा संन्यास,
पण ती लिहिते इतिहास

स्वतःला झाकून ठेवलेलं विश्व
तीच जीवन म्हणजे जिद्दीच पर्व
ती नेहमीच तशी नवती तिला यश आलं
शांततेत तिचा,स्वप्नांना जिंकण्यात बळ आलं

— ऋषिकेश केने
भारसवाडा
keneonline01@gmail.com

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या