spot_img

आष्टी तालुक्यात सोयाबीन पिकांवर हुमणी अळीचा खुप मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव*

तळेगाव (शा.पंत ) आष्टी तालुक्यात सोयाबीन पिकांवर हुमनी अळीचा खुप मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव त्यामुळे शेतकऱ्यांचे खुप मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होण्याचे संकेत
आज दिनांक ४/८/२०२५ रोजी तालुका कार्यालय आष्टी येथे सोयाबीन पिकात हुमणी अळी प्रादुर्भाव झाल्याचे पार्श्वभूमीवर कृषी विज्ञान केंद्र (kvk) सेलसुरा,जिल्हा वर्धा येथील कीटकशास्त्रज्ञ डॉ.निलेश वजीरे यांनी प्रादुर्भावग्रस्त क्षेत्र मौजा लहान आर्वी, जैतापूर, किन्हाळा येथे प्रादुर्भावग्रस्त शेतात भेट देऊन पाहनी केली त्याचप्रमाणे मौजा लहान आर्वी ग्रामपंचायत येथे त्यांनी शेतकऱ्यांना हुमणी अळी प्रादुर्भाव व त्यासंबंधी करावयाच्या उपायोजना या संदर्भात मार्गदर्शन केले यावेळेस त्यांनी हुमणी अळी बंदोबस्त करण्यासाठी फिफ्रोनिल४०%+इमिडाक्लोप्रिड ४०% हे मिश्र कीटकनाशक ५ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून जमिनीत पुरेसा ओलावा असताना आळवणी (ड्रेंचिंग) करावी असे सुचवले तसेच रब्बी हंगामाच्या सुरुवातीस मेटारायझियम २ किलो प्रति एकर या जैविक बुरशीला शेणखतात मिसळून शेतात पसरून द्यावे जेणेकरून भविष्यात या किडीला प्रतिबंध होईल असे सांगितले शेतकरी बंधूनी योग्य उपाययोजना करून वेळीच हुमणी अळी किडीला अटकाव करावा असे प्रतिपादन केले यावेळेस तालुका कृषी अधिकारी आष्टी श्री.आर. ए. वाघमारे, मंडळ कृषी अधिकारी आष्टी श्री पाटणे,उपकृषी अधिकारी,आष्टी २ कु. मुसळे मॅडम सहाय्यक कृषी अधिकारी, लहान आर्वी कु.देशमुख मॅडम ,लहान आर्वी,किन्हाळा येथील मान्यवर व शेतकरी वर्ग खुप मोठ्या संख्येने उपस्थित होते.

(दैनिक शहीद भूमी प्रहार न्यूज नेटवर्क)

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या