spot_img

ऑगस्ट क्रांती आष्टी,चिमुर आणि यावलीचा स्वातंत्र्य संग्राम

अखिल भारतीय काँग्रेस कार्यकारिणीने ८ऑगष्ट १९४२ ला मुंबईत ब्रिटिशांविरुद्ध “चले जाव”चा ठराव एकमताने पारित केला.*वर्धा जिल्ह्यातील आष्टी* या गावाला वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज ९ऑगस्ट१९४२ रोजी संदेश देऊन चंद्रपूर जिल्ह्यातील चिमुर कडे निघून गेले.आरती मंडळाच्या हस्तलिखित ‘धर्मसेवा’ मासिकाचे संपादक मोतीलालजी होले यांनी वर्धा वरून आणलेल्या बुलेटिन्स वर १४ तारखेला प्रमुख काँग्रेस नेते आणि आरती मंडळाचे कार्यकर्ते यांनी शेतात गुप्तपणे विचार विनिमय केला.१६ऑगष्ट १९४२रोजी आष्टी पोलीस स्टेशन समोर सत्याग्रह सुरू करण्याचे ठरविले.वं.महाराजांनी दिलेल्या सायक्लोस्टाईल यत्रावरून संदेश सुचनांच्या काढलेल्या प्रती गावोगावी प्रसारित झाल्या.वं.महाराजा़च्या प्रेरणेने निर्धारित दिवशी
आष्टीत स्वातंत्र्य संग्राम घडून आला.या संग्रामात आरती मंडळाचे कार्यकर्ते, स्त्रिया- पुरुष आदींनी हिरीरीने सहभाग घेतला .१६ऑगष्ट १९४२ रोजी चिमुरलाही वंदनीय राष्ट्रसंतांच्या प्रेरणेने स्वातंत्र्य संग्राम घडून आला.या दिवशी लोकांच्या जमावाने पोलीस ठाणे, तहसील कार्यालय, पोस्ट ऑफिस इत्यादी सरकारी इमारती जाळून टाकलया.१६ऑगस्ट १९४२रोजी नागपंचमीच्या दिवशी गावावर स्वातंत्र्याचा झेंडा फडकला.

अमरावती जिल्ह्यातील यावली हे वंदनीय राष्ट्रसंतांचे जन्मगाव १५ऑगष्ट१९४२रोजी यावली पोलिस ठाण्यावर राष्ट्रीय झेंडा लावण्याचा इराद्याने स्वातंत्र्याची गाणी गात तेथील गांधी चौकातून मिरवणूक निघाली.ठाणेदाराने प्रांरभी गोळीबाराची धमकी दिली असली तरी शेवटी समजुतीने प्रसंग टाळण्याचा प्रयत्न केला.
तिरंगा झेंडा फडकाविल्यावर आज आपण स्वातंत्र झाल्याचे घोषित करून महात्मा गांधी नावाचा जयजयकार करण्यात आला.१६ते १८ ऑगस्ट १९४२ असा एकूण ३ दिवस स्वातंत्र्य संग्राम चालला.या ३ दिवसांच्या स्वातंत्र्याची बातमी आझाद हिंद सेनेचे सरसेनापती सुभाषचंद्र बोस यांच्या हवाल्याने जर्मनीच्या बर्लिन रेडिओ ने प्रसारित केली होती.

२८ऑगष्ट१९४२ रोजी वंदनीय राष्ट्रसंतांना चिमुर संग्रामासाठी जबाबदार धरून ब्रिटिश सरकारने अटक केली.सुरवातीला२८ऑगस्ट ते २०सप्टेंबर १९४२पर्यन्त वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांना नागपूर येथील मध्यवर्ती कारागृहात आणि त्या नंतर २१सप्टेंबर ते २डिसेंबर १९४२पर्यंन्त रायपूर येथील मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले.२डिसेबर१९४२रोजी त्यांची बिनशर्त सुटका करण्यात आली.

जयगुरू
संदर्भ -जी.यो.खंड

संकलन -सुरेश श्री. देसाई
पुणे विभागीय प्रचार सेवाधीकारी,
श्रीगुरूदेव सेवा मंडळ श्रीक्षेत्र देहु, पुणे

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या