आष्टी (शहीद) आष्टीचे सह दुय्यम निबंधक प्रत्येक खरेदी-विक्रीवर कमिशन घेतो. हे जग जाहीर असून त्यांच्यासमोर अंतापुर तळेगाव येथील शेताची रजिस्टर विक्री हजर केली. त्या विक्रीवर ज्या व्यक्तीने आक्षेप नोंदवला त्यानेच आक्षेप मागे घेतला असता सह दुय्यम निबंधक यांनी सदर विक्री करण्याकरता मोठ्या रक्कमेची ची मागणी केली व ती मोठी रक्कम विकत देणाऱ्याने न दिल्याने त्या विक्रीत अडथळा तयार करण्याचे उद्देशाने स्वतःवरूनच लोकांना आक्षेप घेण्याकरिता जाहीर नोटीस बजावला.
सविस्तर वृत्त असे आहे की मौजा अंतापूर येथील शेत सर्वे न 18/2 क्षेत्र 0.30 या शेताची खरेदी करण्याकरिता सह दुय्यम निबंधक यांच्या कार्यालयात खरेदी खत हजर केले असता त्या खरेदीवर तळेगाव येथील महिलेने आक्षेप नोंदवला होता. परंतु त्याच महिलेने तो आक्षेप मागे घेतल्याने ते खरेदीखत करण्यास कोणतीही कायदेशीर अडचण नसताना आष्टी येथील सह दुय्यम निबंधक यांनी खरेदी नोंदवि ण्याकरिता मोठ्या चिरीमिरीची मागणी केली, परंतु ती चिरीमिरी सामान्य शेतकऱ्याला देणे शक्य नसल्याने आष्टी येथील सह दुय्यम निबंधक यांनी त्याच्या खरेदीत अडथळा तयार करण्याचे उद्देशाने स्वतःवरूनच जाहीर नोटीस प्रकाशित करून लोकांना आक्षेप घेण्यास प्रोत्साहन दिले. त्यामुळे आष्टीचे सह दुय्यम निबंधक कार्यालयात किती भ्रष्टाचार फोफावला आहे हे स्पष्ट दिसून येते.
त्याबाबत सह दुय्यम निबंधक फुलझेले यांना आमच्या प्रतिनिधीने विचारणा केली असता सह दुय्यम निबंधक यांनी त्यांचा तोरा दाखवून मी न्यायाधीश आहे. मला चुकीचा निर्णय घेण्याचा सुद्धा अधिकार आहे व तो निर्णय घेण्यासाठीच मी जाहीर नोटीस प्रकाशित केली. अशा प्रकारे बतावणी केली.
आष्टी येथील सह दुय्यम निबंधक यांनी या अगोदर सुद्धा अकृषक ची परवानगी नसताना सुद्धा चिरीमिरी घेऊन आष्टी येथील गजानन नगरीतील कित्येक खरेदीखत बेकायदेशीर नोंदणीकृत केले आहे. आष्टीचे सह दुय्यम निबंधक यांच्या अशा प्रकारच्या कृतीमुळे सामान्य जनमानसात प्रचंड असा रोष निर्माण झाला असून त्यांच्यावर कारवाईची मागणी जोर धरत आहे. तरी वरिष्ठ अधिकारी जनतेला खरा न्याय देऊन आष्टी येथील सह दुय्यम निबंधक यांच्यावर कारवाई करतील काय ? याकडे आष्टी तालुका वासियांचे लक्ष लागले आहे.