spot_img

*जिल्हा वार्षिक योजनेचा निधी वितरणात पालकमंत्र्याकडून भेदभाव – खासदार श्री. अमर काळे हयांनी व्यक्त केली नाराजी*.

Wardha Team
Shahid Bhumi Prahar

वर्धा :दिनांक 15.8.2025 ला हिंगणघाट येथे वैशिष्टयपूर्ण योजना सन 2015-16 व 2018-19 अंतर्गत पुर्ण करण्यात आलेल्या हिंगणघाट नगर परिषदेच्या रु. 4.40 कोटी खर्च करुन बांधलेल्या इमारतीचे लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला होता. हया कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका छापतांना प्रोटोकॉल न पाळल्याने खासदाराचा झालेला हक्कभंग त्यावर मुख्याधिकारी, हिंगणघाट हयांची जाहीर माफी मागणे एवढेच नव्हे तर जिल्हा वार्षिक योजनेचा रु. 350 कोटीच्या निधीवाटपात पालकमंत्री डॉ. श्री. पंकज भोयर हयांनी खासदारांनी कामे प्रस्तावित करुनही त्यांना राजकीय द्वेषापोटी निधी उपलब्ध करुन न देणे व त्यावर खासदार श्री. अमर काळे यांनी हिंगणघाट येथील कार्यक्रमात पालकमंत्र्यांच्या आकसपुर्ण वागणुकीवर व्यासपीठावरुन जाहीर नाराजी व्यक्त करणे व निधी न मिळाल्यास उपोषणाची धमकी देणे अशा एक ना अनेक घटनांनी हिंगणघाट महसुल उपविभागच नाही तर जिल्हा व विदर्भ दिवसभर चर्चेत होता. पालकमंत्र्यांची निधीवाटपात केलेला दुजाभाव हा खासदारांना अत्यंत दुखावणारा व वेदनादायी प्रसंग ठरला. तसे त्यांनी प्रत्यक्षात बोलून पण दाखविले. काँग्रेसची इतकी वर्षे सत्ता होती पण काँग्रेसने अशा पध्दतीने निधी वाटपात कधीच सुडाचे राजकारण केले नाही. इतकेच काय कधी कधी तर सत्तापक्षापेक्षा विरोधी पक्षाच्या नेत्याला जास्त निधी दिला जायचा हेही वास्तव त्यांनी बोलून दाखविले. इतकेच नव्हे तर पालकमंत्री पण 2014 पर्यंत काँग्रेस मध्येच होते त्यांना पण या गोष्टींची माहीती असावी.

कार्यक्रमाला गेल्यागेल्याच न.प. इमारतीचे लोकार्पण सोहळा पालकमंत्री हयांचे अध्यक्षतेखाली व श्री समीर कुणावार हयांचे हस्ते करण्यात आला व त्यामुळे प्रोटोकॉल पाळला गेला नाही व ही बाब निमंत्रण पत्रिकेपासून तर इमारतीचे कोनशिला पर्यंत असल्याचे खासदार श्री अमर काळे हयांचे लक्षात आली. वर्धा जिल्हयात सध्या भारतीय जनता पक्षाचे 4 आमदार राज्यमंत्री व पालकमंत्री भाजपचेच असून केवळ खासदारच विरोधी पक्षाचे असल्याने जिल्हयात सतत शासकीय कार्यक्रमात कोणताही प्रोटोकॉल न पाळता शासकीय कार्यक्रम घेतले जातात ही बाब लोकशाहीला अत्यंत घातक असून हयात प्रोटोकॉल अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी, वर्धा हयांनी सुध्दा तटस्थ भूमिका घेणे आवश्यक असल्याचे खासदार श्री. अमर काळे हयांनी व्यक्त केले.

दूसरा महत्वाचा विषय म्हणजे हिंगणघाट शहरातील पाणीपुरवठा योजना पुर्ण करुन महायुती सरकारने मोठा गाजावाजा केला. पण आजही हिंगणघाट शहरातील बऱ्याच भागात पाणीपुरवठाच होत नाही तर काही टाक्या सुध्दा गळत असल्याचे सर्वसामान्य लोकांकडून तक्रारी प्राप्त झाल्या असल्याचे खासदार श्री अमर काळे यांनी सांगितले.

सर्वात महत्वाचे म्हणजे नुकतीच जिल्हा वार्षिक योजनेचे निधी वाटप होऊन ज्या कामांना निधी वाटप झाला त्या कामांचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. वर्धा हयांचेकडून निर्गमित करण्यात आले. त्यात खासदार श्री अमर काळे हयांनी प्रस्तावित केलेल्या कामापैकी एकही काम नसल्याचे खासदार श्री अमर काळे यांचे लक्षात येताच त्यांनी ही बाब हिंगणघाट येथल व्यासपीठावरुन बोलतांना व्यक्त केली. त्यांनी हे ही सांगितले की, मी जनसुविधा, तिर्थक्षेत्र, पर्यटन स्थळ, जि.प. शाळा वर्गखोली बांधकाम, स्मशान शेड हया लोकहिताचीच कामे प्रस्तावित केली होती. पण पालकमंत्र्यांनी साधे स्मशान शेड सुध्दा देऊ नये हे अती होतयं. इतकं सुडबुध्दीने तर काँग्रेस पण तुमच्याशी वागले नाही. मग ही तुमची एका खासदारासारख्या लोक प्रतिनिधीशी वागण्याची पध्दत कोणती? त्यांनी हेही सांगितले मी खासदार म्हणून मला 6 विधानसभाकरीता रु. 5 कोटी, खासदार निधी तर आमदाराला एका विधानसभेकरीता 5 कोटी हे ही नसे थोडके. असे असतांना पालकमंत्र्यांकडून निधी वाटपात असा दुजाभाव होणे हे फारच दु:खद आहे. विरोधी पक्ष म्हणून आम्हाला 35 टक्के तर दया. पण शुन्य त्यांनी निर्धार व्यक्त केला मी डीपीडीसीचा निधी घेणारच व तुम्हाला तो दयावाच लागेल. मग त्यासाठी मला उपोषण करावे लागले तरी चालेल. उपोषणात माझे जे होईल ते होईल व माझ्या जीवाचे काही बरेवाईट झाले तर ती सरकारची जबाबदारी असेल त्यांनी पाहून घ्यावे.

शेवटी हिंगणघाट विधानसभा क्षेत्रातील लोकहीताचे विकासाचे कामात मी तुमच्या सोबत असेल मी विरोधाला विरोध करणार नाही अशा ग्वाही खासदार श्री. अमर काळे हयांनी आमदार श्री. समीर कुणावार यांना दिली. शेवटी इमारतीची पाहणी केल्यानंतर इमारतीतील व्यवस्था बघून अशी नगर परिषद आर्वीवाल्यांनी पण बनवायला हवी होती पण दुर्दैवाने ती बनली नाही अशी खंत खासदार श्री अमर काळे यांनी केली.

निवडणुक काळात आपण शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. राम हा एकवचनी होता. वडीलांनी रामाच्या सावत्र आईला दिलेले वचन रामानी 14 वर्षे वनवास भोगून पाळले. पण त्याच रामाच्या नावाचा गाजावाजा करुन आपण निवडणुका जिंकल्या पण निवडणुका जिकल्यानंतर श्री. देवेंद्र फडणवीस साहेब यांनी शेतकऱ्यांना दिलेले कर्जमाफीचे वचन अजूनपर्यंत 8 ते 9 महिन्याचा कालावधी होवूनही पूर्ण करु शकले नाही. विशिष्ट वेळेवर कर्जमाफी करु असे म्हणणारे फडणवीस अजून शेतकऱ्यांच्या आत्महत्या होण्याची तर वाट पाहत नाही ना!

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या