spot_img

तहसीलदाराचा खुर्चीवर बसून गाण्यांचा रिॲलिटी शो – जनता म्हणते, “शासन कार्यालय की मनोरंजन क्लब?”* ——————————- “कार्यालयात गाण्यांची महफिल, बाहेर जनतेची कैफिल – उमरी तहसीलदारांचा व्हिडीओ व्हायरल” ——————————- *“ तहसील कार्यालयातील अधिकारी ‘गायक’ – जनता मात्र भिकाऱ्यासारखी दारात!”* ——————————-

नांदेड Team
Shahid Bhumi Prahar:

नांदेड जिल्ह्यातील उमरी तहसील कार्यालयातून समोर आलेल्या व्हिडीओमुळे प्रशासनाची प्रतिष्ठा पुन्हा एकदा कलंकित झाली आहे. तहसीलदार साहेब स्वतःच्या खुर्चीवर बसून, उपस्थित महिला-पुरुष कर्मचाऱ्यांना सामावून घेत गीतगायनाची महफिल रंगवत असल्याचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला आहे.

*काय चाललंय शासकीय कार्यालयात?*
सरकारने नुकताच आदेश काढला होता की, शासकीय कार्यालयात वाढदिवस साजरे करणे, गुलदस्ते देणे, चहा-पार्टी, सेलिब्रेशन इत्यादींना पूर्ण बंदी असावी. मात्र हा आदेश कागदावरच मर्यादित राहिला आहे. प्रत्यक्षात शासकीय कार्यालयं म्हणजे चहा पार्टी, गप्पांचा अड्डा, वाढदिवस सेलिब्रेशन आणि आता तर गाण्यांचा रिॲलिटी शो!

*जनतेची ओरड पण कोणी ऐकणार नाही*
तहसीलदार कार्यालयात गाण्यांचा कार्यक्रम सुरु असताना, बाहेर जनतेला कामासाठी दहा-दहा दिवस चकरा माराव्या लागत आहेत. “काम आज करा, नाहीतर उद्या या” ही सरकारी पद्धत बदलतच नाही. सर्वसामान्य नागरिकांच्या अर्जांकडे कोणी लक्ष देत नाही, पण तहसीलदार साहेब मात्र ऑफिसात माईकविना गायक बनलेले दिसत आहेत.

*खुर्ची कामासाठी की रिलसाठी?*
ही खुर्ची जनतेच्या विश्वासाने आलेली आहे, करमणुकीसाठी नाही. शासनाने जर सोशल मीडियासाठी आचारसंहिता लागू केली असेल, तर आता एक “शासकीय कार्यालय आचारसंहिता” तात्काळ लागू करावी. अन्यथा अधिकारी- कर्मचारी खुर्चीवर बसून गाणी गातील, रिल्स बनवतील आणि जनता मात्र बाहेर उभी राहून आपले हक्काचे काम होण्याची वाट पाहत राहील.

*जनतेचा प्रश्न — कारवाई होईल का?*
नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले हे जिल्ह्यातील कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळखले जातात. मग आता या व्हायरल व्हिडीओवर ते तहसीलदारावर कारवाई करतात की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जिल्ह्यातील मतदार-जनता आज एकच विचारत आहे – “तहसीलदार कार्यालय म्हणजे शासनाचे कामकाजाचे ठिकाण की मनोरंजन क्लब?”

* जनतेच्या करातून मिळणारा पगार घेऊन कार्यालयीन वेळेत गाणी गाणं योग्य आहे का?

* जिल्हाधिकारी, पालकमंत्री यांना हे दिसत नाही का?

* की हीच “भाजप राजवटीतील शासकीय कार्यपद्धती” आहे?

गाणी गा, कला जपा – पण शासकीय खुर्चीवर बसून नाही. ती खुर्ची लोकसेवेची आहे, लोकांचा विश्वास राखण्याची आहे.
*अन्यथा जनता विचारेल “साहेब, कामं थांबवून गाणी गाण्यासाठीच का शपथ घेतली होती?

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या