spot_img

लोकांना स्वतः च्या घरापासून -मालमत्ते पासून, आणि घरकुल योजनेपासून वंचीत करूं नका* -दिलीप पोटफोडे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आर्वी विधानसभा अध्यक्ष खालील आशयाच्या मागण्याचे निवेदन तहसीलदार व मुख्याधिकारी यांना सादर तर लोकप्रिय आमदार सुमितदादा वानखेडे यांची भेट घेऊन विषयाची गंभीरता निदर्शनास आणून दिली असता सकारात्मक प्रतिसाद प्रश्न निकाली काढण्याचा शब्द

Dainik Shahid Bhumi Prahar Team

आर्वी :- आर्वी शहरातील नागरिकांच्या मागील काही दिवसापासून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या आर्वी येथील जनसंपर्क कार्यालयात अनेक प्रभागातील वार्डातील घरकुल योजनेच्या लाभास पात्र लाभार्थ्यांच्या तक्रारी प्राप्त होत होत्या आर्वी नगरपालिका द्वारा जागेचा सातबारा नसल्याचे कारण दाखवून आर्वी शहरातील1) जनता नगर 2) मेहर नगर 3) संजय नगर 4) आंबेडकर वार्ड 5) विठ्ठल वॉर्ड 6) दाऊत नगर 7) श्रीहरी कॉलनी 8) घोटकर प्लॉट 9) राणीलक्ष्मी बाई वॉर्ड, 10) हनुमान वार्ड, पुरसुमल चौक 11) बाग मोहल्ला 12) नेताजी वार्ड 13) राष्ट्रसंत वार्ड 14) -खर्डी वॉर्ड 15) गुरुजी वॉर्ड,) चोरडिया ले आउट-मेहुल टॉकीज परिसर, वॉर्डातील नागरिकांना घरकुल योजनेपासून वंचित ठेवल्या जाईल अशा पद्धतीच्या सूचना नागरिकांना न. प. आर्वी द्वारा केल्या जात होत्या, या तक्रारीच्या संबंधांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी द्वारा दिनांक 28 /9 /2025 रोजी मुख्याधिकारी न प आर्वी यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आर्वी विधानसभा अध्यक्ष दिलीप पोटफोडे यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी भेट घेतलीअसता, मुख्याधिकारी किरणजी सुक्कलवाड साहेब यांनी या 15 वार्डातील परिसराचे सातबारे बंद झाले नाही, तहसील कार्यालय आर्वीला अनेकदा पत्र व्यवहार करून देखील कारवाई झाली नसल्याने योजना राबविण्यास अडचण येत असल्याचे सांगितले असता, या सर्व वॉर्डात यापूर्वी सर्व शासकीय योजना राबविण्यात आल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी द्वारा ठामपणे निदर्शनास आणून देण्यात आले, तसेच कोणत्याही परिस्थितीत कागदपत्रांच्या कारण दाखवत ही लोकं योजनेपासून वंचित राहणार नाही, कोणत्याही कृत्रिम कागदी अडचणी निर्माण करून या 15 वार्डातील लोक अतिक्रमितांच्या श्रेणीत येणार नाही या बाबतीत चर्चेत सांगण्यात आलं तसेच लेखी निवेदन देत असं झाल्यास आंदोलनाच हत्यार उपसल्या जाईल असा इशारा देण्यात आला, यानंतर आज दिनांक 03/09/2025 रोजी तहसीलदार आर्वी यांच्या कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व प्रमुख पदाधिकारी धडकले तहसीलदार आर्वी हे दौऱ्यावर असल्यामुळे, नायब तहसीलदार यांना निवेदनाद्वारे आर्वी शहरातील बंद असलेले सातबारे च्या जागेवर गावठाण आबादी आदेश विना विलंब काढणे बाबत चर्चा करून निवेदन सादर करण्यात आले यावेळी आर्वी शहरातील या 15 वार्डातील नागरिक या या जागेवर मागील चाळीस-पन्नास वर्षापासून राहत असल्याबाबत अवगत करण्यात आले आज पर्यंत सर्व शासकीय योजनेचा लाभ मिळाला असल्याचे निदर्शनास आणून दिले तसेच तातडीने आर्वी शहराच्या या 15 वॉर्ड चा विषय मार्गी लावण्या बाबत विनंती करण्यात आली अन्यथा येत्या 5/09/2025 पासून आंदोलनाचा हत्यार उपसण्यात येईल असा इशारा देण्यात आला, यानंतर लगेच लोकप्रिय आमदार सुमित दादा वानखेडे यांना भेटून निवेदन देत चर्चा करून प्रश्नाची दाहकता आणि गांभीर्य लक्षात आणून दिले असता प्रश्न सोडवण्याचा शब्द आमदार सुमित दादा वानखेडे यांनी दिला आहे, यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष शुभांगी कलोडे, आर्वी तालुका अध्यक्ष माधुरी सपकाळ, आर्वी शहर अध्यक्षा सीमा डाहाके, वर्धा जिल्हा उपाध्यक्ष सुरेंद्र वाटकर, जिल्हा सरचिटणीस दिनकर कोयरे, आर्वी तालुका अध्यक्ष अशोक धानोरकर, आर्वी शहर अध्यक्ष दिलीपराव बोरकर, जळगाव जि. प. सर्कल प्रमुख प्रफुल सोमकुवर, सिद्धार्थ कळंबे, राजू बोरकुटे, व इतर प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या