*हिंगणघाट: तालुका प्रतिनिधी*
तालुक्यातील वडनेर येथे रहिवाशी असलेली विद्यार्थिनी कुमारी शिखा देवानंद तेलतुंबडे हिने सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या वतीने घेण्यात आलेल्या सहाय्यक प्राध्यापक पदासाठी सेट परीक्षा उत्तीर्ण केली आहे. कु. शिखा ही शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्था अमरावती येथील माजी विद्यार्थिनी आहे. तसेच तिने प्राणिशास्त्र झूआलॉजी या विषयांमध्ये एम. एस. सी. केले आहे. तिच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होऊन अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.